मुंबई 11 सप्टेंबर : आपल्या भारतात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहातात. ज्यामुळे एखादा सण किंवा कोणतीही गोष्ट करण्यासाठी ते त्यांची स्वत:ची परंपरा पाळतात. त्यांपैकी अशा काही चालीरिती आहेत, ज्या आजही आपल्याला माहित नाहीत. मग विचार करा संपूर्ण जगभरात अशा किती परंपरा आणि चालीरिती असतील ज्या आपल्या विचारशक्तिच्या पलिकडल्या आहेत. अशाच एका परंपरेबद्दल एक माहिती समोर आली आहे, जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कार करण्याची प्रत्येक धर्माची स्वतःची परंपरा आहे. हिंदू धर्मात मृत्यूनंतर मृतदेह जाळण्याची परंपरा आहे. तर ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मात मृतदेह दफन केले जातात. परंतू काही देशांमध्ये अंत्यसंस्काराचे नियम खूप विचित्र आणि भयानक आहेत. जे जाणून तुम्हाला विश्वास ठेवणं देखील कठीण होईल. चीन आणि फिलिपाईन्समध्ये असा समज आहे की, मृतदेह उंचावर टांगल्यास त्याचा आत्मा थेट स्वर्गात जातो. त्यामुळे येथे अनेक ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह शवपेटीमध्ये ठेवून उंच खडकांवर टांगला जातो. हे वाचा : Video : त्याला केस कापण्यासाठी 47 सेकंद पुरेस…. तरुणाच्या नावे आगळा-वेगळा रिकॉर्ड, ज्याला कोणीही तोडू शकलं नाही तर इंडोनेशियातील परंपरा काही वेगळ्याच आहेत. येथे एखाद्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्यासाठी रडण्याची परवानगी नाही. एखाद्याला गमावल्याच्या दु:खात अश्रू येणे अगदी सामान्य आहे. कधीकधी लोकांना या दुःखातून सावरण्यासाठी बराच वेळ लागतो. पण इंडोनेशियातील बालीमध्ये मृतांना जिवंत समजले जाते. असे मानले जाते की तो अजूनही झोपलेले आहे. यामुळे येथे कोणाच्या मृत्यूवर अश्रू ढाळण्यास मनाई आहे. दक्षिण मेक्सिकोच्या मायामध्ये, मृतदेह घरीच पुरण्याची परंपरा आहे. जेणेकरून नातेवाईकांच्या मृत्यूनंतरही ते त्यांच्या प्रियजनांसोबत त्यांच्याच घरात राहती. तसेच असं करण्यामागे गरिबी हेही एक कारण आहे, कारण येथील अनेक लोकांकडे पुरेसा पैसा नाही, ज्यामुळे ते बाहेर जाऊन मृतांचे अंतिम संस्कार करू शकतील. व्हिएतनाममध्ये अनेक ठिकाणी असे मानले जाते की, मृत व्यक्तीच्या आत्म्याला पूर्ण भक्तिभावाने बोलावले, तर तो त्याच्या शरीरात पुन्हा प्रवेश करू शकतो. यासाठी, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याचा मोठा मुलगा किंवा मुलगी मृतदेहाचे कपडे काढून त्या व्यक्तीच्या आत्म्याला बोलावतात, जेणेकरून त्याचा आत्मा परत येतो. हे वाचा : Cyrus Mistry Death : ना जाळून, ना दफन करून, पारशी समाजात असा होतो अंत्यसंस्कार विधी तिबेटमधील बौद्ध समुदायामध्य, तर भयानक प्रकार केला जातो. हे लोक माणसाच्या मृत्यूनंतर, त्याच्या मृतदेहाचे लहान तुकडे करून गिधाडांना खायला दिले जाते. याला आकाश दफन म्हणतात, म्हणजेच आकाशात अंत्यसंस्कार करणे. असे मानले जाते की, असे केल्याने गिधाडाच्या उडण्यासोबतच व्यक्तीचा आत्माही उडून स्वर्गात पोहोचतो. तसे, मृत शरीर गिधाडांना खायला देण्याची परंपरा पारशी समाजातही पाळली जाते. या समाजातील लोक मृत शरीराला टॉवर ऑफ सायलेन्सवर खूप उंचावर ठेवतात, ज्याला गिधाडे खातात. दक्षिण कोरियामध्ये अनेक लोक मृत व्यक्तीचे अवशेष वेगवेगळ्या रंगात रत्नासारख्या मणीमध्ये जतन करतात. ते घरात एका विशिष्ट ठिकाणी ठेवले जातात. पापुआ न्यू गिनीचे मेलेनेशियन आणि ब्राझीलचे काही आदिवासी लोक मृत्यूच्या संकल्पनेभोवती असलेले भय आणि गूढ दूर करण्यासाठी त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह खातात. यानोमामी लोकांमध्ये मुले या कामात सक्रिय सहभाग घेतात. दर सात वर्षांनी एकदा, मादागास्करचे मालागासी लोक त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह कबरीतून काढतात, त्यांना कापडात गुंडाळतात आणि त्यांच्यासोबत नाचतात. यादरम्यान, मृतांच्या अवशेषांमधून येणारा दुर्गंधी दूर करण्यासाठी त्यावर अल्कोहोल फवारणी केली जाते. असे मानले जाते की, असे केल्याने मरणारा माणूस परत येतो. फिलीपिन्समधील टिंगुई लोक त्यांच्या प्रियजनांच्या अंत्यसंस्कारासाठी सर्वोत्तम कपडे घालतात. त्यांचा मेकअप करा. त्यांना खुर्चीवर बसवतात आणि त्यांच्या ओठात पेटलेली सिगारेट ठेवतो. ज्यानंतर हे प्रेत असेच ठेवले जाते, त्यांना आवश्यक वस्तू आणि भरपूर अन्न जवळ ठेवून खोली बंद केली जाते. (विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.