मुंबई 5 ऑगस्ट : टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचे रविवारी पालघर येथे अपघातात निधन झाले. त्यावेळी सायरस मिस्त्री गुजरातमधील उडवाडा येथून कारने मुंबईला परतत होते. त्यावेळी त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातावेळी कारमध्ये 4 लोक होते, ज्यांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन लोक गंभीर जखमी आहेत. सायरस मिस्त्री यांच्या निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सायरस मिस्त्री यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन (post mortem) करून त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर सायरस मिस्त्री यांचे काही नातेवाईक इतर देशांतून भारतात येत आहेत, त्यामुळे त्यांच्या पार्थिवावर सोमवार नाही, तर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रिपोर्ट्सनुसार सायरस यांच्या पार्थिवावर मुंबईतील वरळी येथील इलेक्ट्रिक स्मशानभूमी किंवा डुंगरवाडी येथील ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मध्ये अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात. हे वाचा : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू; भयंकर अपघाताचा पहिला Video आला समोर परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, पारशी समाजाची अंत्यसंस्काराची पद्धत ही फारच वेगळी आहे? हो, पारशी समाजात हिंदू धर्माप्रमाणे मृतदेह जाळला जात नाही किंवा इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माप्रमाणे पुरला ही जात नाही. मग आता तूमच्या मनात हा प्रश्न नक्कीच उभा राहिला असेल की मग त्यांच्या मृत देहाचं नक्की काय करत असतील? याचं उत्तर जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतू पारसी लोकांमध्ये मृतदेह पक्षांना खाण्यासाठी सोडला जातो. पारशी समाजातील एखाद्याचा मृत्यू झाला की, मृतदेह स्मशानभूमीत नेला जात नाही, तर त्यांचं पार्थिव ‘टॉवर ऑफ सायलेन्स’च्या वरती आकाशाकडे सोपवले जाते. त्यानंतर गिधाडे आणि पक्षी येऊन ते मृतदेह खातात. गिधाडांनी शव खाणे हा पारशी समाजाच्या प्रथेचा एक भाग आहे. मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ झोरोस्ट्रियन स्टडीजच्या तज्ज्ञांनी सांगितले की, पारशी समाजातील मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची पद्धत इतर समाजांपेक्षा खूप वेगळी आहे. या समाजाती लोकांसाठी मानवी शरीर हे निसर्गाला प्रदुषित करते. ज्यामुळे शव जाळून किंवा दफन करुन ते पर्यावरणाचं नुकसान करत नाहीत. हे वाचा : पारशींचं पवित्र तीर्थस्थळाहून परतत असताना काळाचा घाला, सायरस मिस्त्रींसाठी ठरलं ते शेवटचं दर्शन झोरोस्ट्रिअन धर्मामध्ये, पृथ्वी, पाणी आणि अग्नि या घटकांना अतिशय पवित्र मानले जाते. पारंपारिक पारसी लोक म्हणतात की मृतदेह जाळून अंत्यसंस्कार करणे हे धार्मिक दृष्टिकोनातून पूर्णपणे अवैध आणि चुकीचे आहे. आता प्रश्न असा उपस्थीत राहातो की, ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ म्हणजे काय? मृत्यूनंतर पारशी समाजातील लोकंचा मृतदेह ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मध्ये घेऊन जातात. ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ला सामान्य भाषेत दख्मा असेही म्हणतात. टॉवर ऑफ सायलेन्स ही एक गोलाकार रचना आहे, ज्याच्या वर मृत शरीर सूर्यप्रकाशात ठेवला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.