मुंबई 28 सप्टेंबर : आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात, ज्यावर लगेचच विश्वास ठेवणं आपल्यासाठी कठीण जातं. सध्या असंच एक प्रकरण अमेरिकेतून समोर आलं आहे. ज्याने सोशल मीडियावर सर्वांनाच हादरवून टाकलं आहे. ज्यामुळे सर्वच लोक या प्रकरणाची चर्चा करत आहेत. खरंतर आपल्या मुलाच्या बाळाला एक महिला जन्म देणार आहे, ज्यामुळे लोकांना आश्चर्य वाटत आहे. खरंतर एक आजी आपल्या नावंडांचे नेहमीच लाड करते आणि गरज पडली तर त्यांना सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी देखील घेते. परंतू इथे तर एक आजीच आपल्या नातवाला जन्म देणार आहे. या आगळ्या-वेगळ्या घटनेमुळेच लोकांना या घटनेबद्दल जाणून घेण्याची उत्सुक्ता वाढली आहे. खरंतर ज्या मुलाला आईने जन्म दिला, मोठं केलं आणि वाढवलं, त्याच मुलाच्या बाळाला एक आई जन्म देणार आहे ते सरोगेटीच्या मार्फत. हे ऐकायला खूप विचित्र वाटत असले तरी हे अगदी खरं आहे. नॅन्सी हॉक असं या महिलेचं नाव आहे. ही महिला आपल्याच मुलाच्या बाळाला लवकरच जन्म देणार आहे.
हे वाचा : महिलेच्या घरातील भिंतीतून बाहेर पडू लागलं रक्त, प्लंबरला बोलावताच समोर आलं धक्कादायक रहस्य
आता तुम्ही विचार करत असाल की हे कसे घडू शकतं, चला ते समजून घेऊ.
नॅन्सी आणि तिचं संपूर्ण कुटुंब
खरंतर आपला 32 वर्षांचा मुलगा जेफ आणि 30 वर्षांची सून कॅम्ब्रिया या दोघांच्या मुलाला ही महिला सरोगेसिद्वारे जन्म देणार आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, तिने आपल्या मुलासाठी आणि सुनेसाठी सरोगेट मदर बनण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच तिला स्वतःची नात होईल, जिला ती स्वतःला जन्म देईल. ५६ वर्षीय नॅन्सीचा हा निर्णय ऐकून कुटुंबातील सर्वांनाच धक्का बसला, मात्र डॉक्टरांनी सुरक्षित घोषित केल्यावर सर्वजण यासाठी तयार झाले. हे वाचा : नवरीला न घेताच नवऱ्यानं काढला पळ, चर्चेत आलं बिहारमधलं अजब-गजब Love, पाहा Video तसे पाहाता हे त्यांच्या घरातील पहिलं मुल आहे असं नाही, या आधी या महिलेला 4 नातवंड आहेत, ज्यांना तिच्या सुनेने जन्म दिला आहे. मात्र, त्यांच्या सुनेने दोन वेळा जुळ्या मुलांना जन्म दिला, ज्यामुळे तिला खूप त्रास झाला, यामुळे कुटुंब पुढे नेण्यासाठी मग अखेर नॅन्सीने ही जबाबदारी स्वतः घेण्याचे ठरवले आणि ती खूप आनंदी आहे.