मराठी बातम्या /बातम्या /Viral /

प्रवासादरम्यान असं काय घडलं की एका बापावर आली मुलाचा मृतदेह समुद्रात फेकून देण्याची वेळ, वाचा

प्रवासादरम्यान असं काय घडलं की एका बापावर आली मुलाचा मृतदेह समुद्रात फेकून देण्याची वेळ, वाचा

ही व्यक्ती आपल्या कुटुंबासह बेकायदेशीरपणे इटलीला जात होता. मात्र, मध्येच एक घटना घडली की त्यांनी आपला मुलगा गमावला.

ही व्यक्ती आपल्या कुटुंबासह बेकायदेशीरपणे इटलीला जात होता. मात्र, मध्येच एक घटना घडली की त्यांनी आपला मुलगा गमावला.

ही व्यक्ती आपल्या कुटुंबासह बेकायदेशीरपणे इटलीला जात होता. मात्र, मध्येच एक घटना घडली की त्यांनी आपला मुलगा गमावला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 20 सप्टेंबर : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये एक व्यक्ती मृतदेह पाण्यात सोडत होता. ज्यानंतर या घटनेबद्दल लोकांमध्ये चर्चा सुरु झाली. त्यानंतर असं समोर आलं की हा मृतदेह पाण्यात सोडणारी व्यक्ती ही त्या मृताचे वडिल आहे. त्यांनी आपल्या काळजावर दगड ठेवून आपल्या मुलाला प्रवासादरम्यान पाण्यातच सोडून दिलं. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की असं का? किंवा नक्की असं काय घडलं?

खरंतर अनेक तुर्की नागरिक समुद्रमार्गे इटलीला रवाना झाले, पण वाटेत अनेक अडचणी आल्या की एका बापाला आपल्या मुलाचा मृतदेह समुद्रात टाकावा लागला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक तुर्की स्थलांतरित समुद्रमार्गे बोटीने इटलीला रवाना झाले होते, परंतु वाटेत पिण्याचे पाणी आणि अन्न संपले, ज्यामुळे काही लोकांना ते सहन झाले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळेबोटीतील तीन मुले आणि तीन महिलांसह एकूण 6 जणांचा मृत्यू झाला.

हे वाचा : डास आपल्याला का चावतात? त्यांच्याबद्दल तुम्हाला माहितीयत 'या' रंजक गोष्टी?

सांगितले जात आहे की ज्या व्यक्तीने मुलाला समुद्रात फेकले तो सीरियाचा रहिवासी आहे आणि ही व्यक्ती आपल्या कुटुंबासह बेकायदेशीरपणे इटलीला जात होता. मात्र, मध्येच एक घटना घडली की त्यांनी आपला मुलगा गमावला.

स्थानिक रिपोर्ट्सनुसार, गेल्या महिन्यात 27 ऑगस्ट रोजी सुमारे 32 स्थलांतरित तुर्कीच्या अंतल्या शहरातून इटलीतील पोझालो येथे जाण्यासाठी निघाले, परंतु प्रवासाच्या अंतराची कोणालाही कल्पना नव्हती आणि तेथे खाण्यापिण्याची कमतरता होती. एवढेच नाही तर तेलही संपू लागले आणि बोटीवरील लोकांची प्रकृती बिघडू लागली. भूक आणि तहान लागल्याने काही लोकांनी समुद्राचे पाणीही प्यायले, त्यामुळे शरीर निर्जलीकरण झाले. यामुळेच या काळात ६ जणांना जीव गमवावा लागला आहे.

एवढं सगळं घडल्यानंतर एक बाप काळजावर दगड ठेवून आपल्या मुलाचा मृतदेह पाण्यात सोडत होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये काही लोकांनी मृतदेह कपड्यात गुंडाळून समुद्रात फेकून दिला आहे. यावेळी बोटीवर उपस्थित अनेकांनी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली.

हे वाचा : इथे महिला अचानक कापू लागल्या केस आणि जाळू लागल्या हिजाब, व्हायरल व्हिडीओनं एकच खळबळ

असे सांगितले जाते की, जमीनीवर पोहोचण्यासाठी आणखी किती काळ लागणार होता हे त्यांना माहित नव्हते. परंतू तेल संपत आले होते, ज्यामुळे बोटीवरील वजन कमी करण्याचा विचार केला. तसेच कितीदिवस मृतदेह असे ठेवणार? त्यांच्यावासाने इतरांना त्रास तसेच रोग पसरु शकतो. ज्यामुळे मग या मृत व्यक्तींचे शव पाण्यात सोडण्याचा बोटीमधील लोकांनी विचार केला होता.

First published:

Tags: Shocking news, Social media, Top trending, Viral news