मुंबई 20 सप्टेंबर : पावसाळ्यात लोकांना मलेरिया, डेंग्यू सारखे आजार उद्भवू लागले आहेत. ज्याचं मुख्य कारण आहेत डास. आपल्याला पाहाताना तो एक छोटा डास वाटतो, ज्याला आपण आपल्या हाताने देखील मरु शकतो, परंतू हा छोटा डास माणसाला किती त्रास देऊ शकतो तुम्हाला माहितीय?दरवर्षी, जगभरातील लाखो लोक डास चावल्यामुळे डेंग्यू आणि मलेरियासाठी उपचार घेतात. आज यावरती उपचार आणि औषध आहेत, परंतू पूर्वीच्या काळात लोक यामुळे भलतेच त्रस्त झाले होते. ज्यावेळी या आजारावर औषध शोधण्यात आलं तेव्हा डॉक्टरांचाही गौरव करण्यात आला. नंतर, १८९७ मध्ये, ब्रिटीश चिकित्सक सर रोनाल्ड रॉस यांनी शोधून काढले की मलेरियासाठी मादी डास जबाबदार आहे. तुमच्या घरातही अनेकदा तुम्हाला डास दिसले असतील. पण ते आपल्याला का चावतात? किंवा रक्त का पितात याबद्दल कधी विचार केलाय? डास चावणे आणि त्यानंतर येणारी खाज ही किरकोळ समस्या आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा संसर्ग गंभीर लक्षणांना कारणीभूत ठरू शकतो. डासांना मानवी रक्त इतके का आवडते की ते तुम्हाला पुन्हा पुन्हा चावतात? यामागचे कारण काय आहे, चला जाणून घेऊ. दरवर्षी जगभरात लाखो लोक डासांमुळे पसरणाऱ्या कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त असतात. मलेरिया हा डास चावल्यामुळे होणारा सर्वात सामान्य आणि धोकादायक रोग आहे. जेव्हा एखादा संक्रमित डास निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा त्या व्यक्तीला मलेरियाची लागण होऊ शकते. जेव्हा डास तुम्हाला चावतात आणि रक्त पितात तेव्हा तुम्हालाही राग आला असेल, पण त्यामागील कारण तुम्हाला माहीत आहे का? घरात किंवा ऑफिसमध्ये कुठेही बसल्यावर अचानक डास तुमचे हात, पाय, मान, तोंड आणि शरीराच्या अवयवांना चावतात आणि तुम्हाला खाज सुटू लागते. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला सांगतो की या डासांचे असे करण्यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे. खरंतर ही डासांशी संबंधीत एक रंजक गोष्ट आहे. तुम्हाला माहितीय एक डास स्वतःच्या वजनाच्या तिप्पट माणसांचे रक्त शोषू शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की डासांना मानवी रक्त शोषून ऊर्जा मिळते. यामुळेच ते वारंवार माणसांना चावतात आणि त्यांचे रक्त पितात. डास तुम्हाला चावल्याने मानवी रक्तातील पोषक तत्त्वे मिळवतात. यामध्ये तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की फक्त मादी डासच माणसांना चावते. जेव्हा ती आपल्या मुलांना जन्म देणार असते तेव्हा ती असे करते. वास्तविक, डासांना बॅक्टेरिया आणि घामाचा वास आकर्षित करतात, त्यामुळे ते माणसांना बऱ्याचदा पायाला चावाताच. यामाचं कारण एकतर पायात असणारी धूळ आणि घाण आहे, तसेच रोगाचा प्रसार करणाऱ्या डासांना फारसे उडता येत नाही. त्यामुळेच पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरही प्रत्येकाला पूर्ण बाह्यांचा शर्ट आणि पूर्ण पँट, म्हणजे शरीर पूर्णपणे झाकले जाणारे कपडे घालण्याचा सल्ला देतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.