मुंबई, 12 मे : जगभरात बँकिंग सेक्टरमध्ये वाढ होत आहे. सर्वच बँकेत कोट्वधींचा व्यवहार चालतो. त्यात एखाद्या समृद्ध देशातील किंवा भागातील बँक देखील तेवढाच पैसा कमावते. काही देशांची नावे ऐकल्यावर आपल्याला असे वाटते की, तेथे किती पैसा आणि किती मोठ्या आर्थिक कंपन्या असतील. विशेषतः अमेरिकेबद्दल बोलायचे झाले तर ते फक्त बँकिंग क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. अशा स्थितीत जर मी तुम्हाला सांगितले की या प्रगत देशात एक बँक आहे, ज्याबँकेकडे फक्त काही कोटी रुपये आहेत, तर तुमचा विश्वास बसेल का? हॉटेलला 3 स्टार, 5 स्टार असं रेटिंग्स का आणि कोण देतं? कधी विचार केलाय? अमेरिका सारख्या देशातील बँक फक्त काही कोटी रुपये कमावते? कसं शक्य आहे? पण हे खरं आहे. अशी बँक अमेरिकेतही अस्तित्वात आहे, जिथे एकूण मालमत्ता 3 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 25 कोटी आहे. ही अधिकृतपणे या देशातील सर्वात लहान बँक आहे, ज्याचे नाव केंटलँड फेडरल सेव्हिंग्ज अँड लोन आहे. चला याबद्दल आणखी काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊ. इथे फक्त 2 लोकांचा स्टाफ केंटलँड फेडरल सेव्हिंग्ज अँड लोन बँकेची स्थापना 1920 मध्ये झाली. ही बँक फक्त 3 प्रकारच्या सेवा पुरवते - बचत खाते उघडणे, गृहकर्ज देणे आणि ठेव प्रमाणपत्र उघडणे. आयफोनसाठी काय पण! गटारात फोन पडताच तरुणाचं धक्कादायक वागणं, नक्की हा प्रकार काय? ब्लूमबर्गशी बोलताना बँकेचे सीईओ जेम्स ए. सॅमसन यांनी सांगितले की, येथे लोकांना त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित वाटत होते, कारण 1920 पासून ही बँक स्टॉक एक्स्चेंजच्या घसरणीच्या काळातही बंद झाली नव्हती. सॅमसन असे या बँकेच्या सीइओचे नाव आहे. 55 वर्षीय सीईओ म्हणतात की, त्यांना वाटते की ही बँक त्याच्याबरोबरच संपेल, कारण बऱ्याच गोष्टी बदलत आहेत. सध्या बँक बचत खाती आणि कर्जावर थोडे चांगले दर देत असल्यानेच चालते. पण त्यांच्याकडे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही, कारण ही बँक ना ग्राहकांना एटीएम फी लावते, ना ट्रान्झॅक्शन फी घेते. अशा परिस्थितीत काही वर्षांनी ही बँक केवळ इतिहासात जमा राहिल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.