नवी दिल्ली 04 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) सतत काही ना काही व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. यावर कधी काय पाहायला मिळेल, हे सांगता येत नाही. आता सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे, ज्यात दिल्ली एअरपोर्टच्या (Delhi Airport) बाहेर दिल्ली-गुरुग्राम हायवेवर एक फूट ओव्हरब्रिजच्या खाली एअर इंडियाचं एक अडकलेलं दिसतं (Air India Aircraft Gets Stuck Under Bridge) . आता या विमानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे पाहून सगळेच हैराण झाले आहेत आणि सोशल मीडिया यूजर्स एकच सवाल करत आहेत, की हे विमान इथे पोहोचलं कसं?
वसईत पैशाचा पाऊस? रस्त्यावर लाखोंच्या नोटांचा खच, पाहा VIDEO
आता एअरलाईन्सनं माहिती दिली आहे, की कोणतीही विमान दुर्घटना घडलेली नाही. हे जुनं आणि खराब झालेलं विमान होतं. एअरलाईन्सनं हे विमान विकलं होतं आणि विमानाचा मालक ते घेऊन जात होता. द टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर एअऱ इंडियाच्या प्रवक्त्यानं म्हटलं, की ज्या विमानाचे फोटो व्हायरल होत आहेत, ते एक जुनं आणि खराब झालेलं विमान असून आम्ही ते विकलं आहे.
#WATCH An @airindiain plane ✈️ (not in service) got stuck under foot over bridge. Can anyone confirm the date and location? The competition starts now👇 pic.twitter.com/pukB0VmsW3
— Ashoke Raj (@Ashoke_Raj) October 3, 2021
व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की विमानाच्या जवळूनच काही गाड्या जाताना दिसत आहेत. सोबतच हायवेवर भरपूर गर्दी आहे. विमान मध्येच अडकल्यानं ये-जा करणाऱ्या गाड्यांनाही अडथळा निर्माण झाल्याचं दिसतं. विमानाचा पुढचा भाग फुट ओव्हरब्रिजच्या खालून बाहेर आला आहे. मात्र, मागचा भाग अडकून बसला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून बहुतेक लोक हैराण झाले आहेत.
फ्लाईटमध्येच एअर होस्टेसचा जबरदस्त डान्स; VIDEO चा इंटरनेटवर धुमाकूळ
सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, पहिल्यांदाच एखादी विमान जमिनीवर पाहिलं आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, ज्या भावानं इथे विमान अडकवलं आहे, त्याला सांगा विमान उडवलं जातं. चालवलं नाही. इतरही अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
विमानाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी दिल्ली विमानतळाला संपर्क साधला असता अधिकाऱ्यानं सांगितलं, की या विमानाचा व्हिडिओ निश्चितच दिल्ली विमानतळाशी संबंधित नाही. व्हिडिओमध्ये विमान विना विंग्सचं नेलं जात आहे. त्यांनी म्हटलं, की विमान घेऊन जाताना चालकाच्या चुकीमुळे ते मध्येच अडकलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Air india, Domestic flight, Video Viral On Social Media