जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / वसईत पैशाचा पाऊस? रस्त्यावर लाखोंच्या नोटांचा खच, पाहा VIDEO

वसईत पैशाचा पाऊस? रस्त्यावर लाखोंच्या नोटांचा खच, पाहा VIDEO

वसईत पैशाचा पाऊस? रस्त्यावर लाखोंच्या नोटांचा खच, पाहा VIDEO

Viral Video: मुंबईनजीक असणाऱ्या वसई परिसरातील एका चौकात 2000 रुपयांच्या हजारो नोटा आढळल्या आहेत. भरचौकात लाखो रुपयांच्या नोटांचा खच पाहून अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वसई, 04 ऑक्टोबर: मुंबईनजीक असणाऱ्या वसई परिसरातील एका चौकात 2000 रुपयांच्या हजारो नोटा आढळल्या आहेत. भरचौकात लाखो रुपयांच्या नोटांचा खच पाहून अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तसेच बऱ्याच लहान मुलांनी आणि नागरिकांनी या नोटा जमा केल्या होत्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल (Viral video) होतं असून सर्वत्र या घटनेचीच चर्चा सुरू आहे. पण काही वेळानंतर या घटनेबाबत भलतंच सत्य समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी जमा केलेल्या नोटा घटनास्थळी टाकून काढता पाय घेतला आहे. ही घटना वसईच्या मधूबन परिसरातील आहे. याठिकाणी 2 हजार रुपयांच्या बनावट नोटांचा खच रस्त्यावर (fake notes of Rs 2000 found on the road in vasai) पडला होता. हे दृश्य पाहून अनेक लहान मुलं आणि काही नागरिकांनी या नोटा जमा केल्या होत्या. पण या नोटा एका वेब सिरीजच्या शुटिंगसाठी वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या नोटा पाहून अनेकजण चक्रावून गेले होते.

जाहिरात

भर रस्त्यावर 2000 रुपयांच्या नोटांचा खच पाहून अनेकांनी रस्त्याच्या कडेला आपलं वाहन थांबवून पैसे उचलण्याचा प्रयत्न केला होता. पण या नोटा नकली असल्याचं लक्षात आल्यानंतर, त्यांनी नोटा घटनास्थळी टाकून काढता पाय घेतला आहे. तुम्ही या व्हिडीओत पाहू शकतो, याठिकाणी अनेक लोकांनी घटनास्थळी गर्दी केली आहे. तसेच काही कर्मचारी हा रस्ता झाडून नोटा गोळा करताना दिसत आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं असून नागरिक यावर प्रतिक्रिया देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: mumbai , vasai
  • First Published :
जाहिरात
जाहिरात