जाहिरात
मराठी बातम्या / Viral / विमानातच स्वतःची वापरलेली अंतर्वस्त्र विकून करोडपती झाली एअर होस्टेस; रातोरात पालटलं नशीब

विमानातच स्वतःची वापरलेली अंतर्वस्त्र विकून करोडपती झाली एअर होस्टेस; रातोरात पालटलं नशीब

विमानातच स्वतःची वापरलेली अंतर्वस्त्र विकून करोडपती झाली एअर होस्टेस; रातोरात पालटलं नशीब

जॅस्मिन फ्लाईटमध्येच आपली अंडरविअर काढून प्रवाशांना विकत असे. जॅस्मिननं खुलासा केला की तिचं हे एक अंतरवस्त्र लोक एक लाख रुपयात खरेदी करत असे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 22 ऑक्टोबर : जगात प्रत्येक माणसाला भरपूर पैसे कमवण्याची इच्छा असते. आपल्याला पैसे मिळावेत असं प्रत्येकालाच वाटतं. याच पैशातून आरामात आयुष्य जगायचं जवळपास प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, पैसे असंच काम न करता मिळत नाहीत. यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते (How to Earn Money). मात्र, नुकतंच एका माजी एअरहोस्टेसनं असा खुलासा केला की तिनं फ्लाईटमध्ये घातलेल्या आपल्या जुन्या अंडरवियर्स विकून 1 कोटी रुपये कमावले आहेत (Air Hostess Earn Millions by Selling Used Underwear). यानंतर तिनं आपली नोकरी सोडली. आज ती अतिशय आरामात आपलं आयुष्य जगत आहे. जॅस्मिन पिंक नावाच्या या महिलेनं आपली 12 तासाची फिक्स शिफ्टवाली नोकरी सोडली आहे. याशिवाय हवाई सुंदरी म्हणून काम करत असताना तिची झोपही पूर्ण होत नसे. कारण होतं सलग शिफ्टमध्ये होणारा बदल. जॅस्मिनने दोन वर्ष एअरहोस्टेसची नोकरी केल्यानंतर हा जॉब सोडला. मात्र, जॉब सोडण्याआधी तिने फ्लाईटमध्येच असं काम करायला सुरुवात केली, ज्यामुळे तिची भरपूर सेव्हिंग झाली. जॅस्मिन फ्लाईटमध्येच आपली अंडरविअर काढून प्रवाशांना विकत असे. जॅस्मिननं खुलासा केला की तिचं हे एक अंतर्वस्त्र लोक एक लाख रुपयात खरेदी करत असे. एकाच रात्रीत पत्नीनं ठेवले 18 पुरुषांसोबत संबंध, पती करत राहिला हे काम फ्लाईटमध्ये घाणेरड्या अंडरवियर्स विकल्यानंतर जॅस्मिनने आपला जॉब सोडला. यानंतर तिला सोफिया ग्रे (Sofia Grey) नावाच्या साईटबद्दल माहिती मिळाली, ज्यावर लोक आपली वापरलेली पॅन्टीज विकतात आणि खरेदी करतात. जॅस्मिनने या साईटवर आपल्या वापरलेल्या पॅन्टीज विकायला सुरुवात केली. आज जॅस्मिनकडे भरपूर पैसे आहेत आणि ती आरामात आपलं आयुष्य जगत आहे. जॅस्मिननं डेली स्टारसोबत बोलताना सांगितलं, की याशिवाय ती ओनलीफॅन्स नावाच्या अॅडल्ट साईटवर (Adult Site) आपले फोटो विकूनही पैसे कमवते. जॅस्मिननं सांगितलं, की एअरहोस्टेस म्हणून काम करताना ती दरमहिन्याला दोन लाख रुपये कमवत असे. मात्र, आता केवळ एक पॅन्टी विकून ती महिन्याला एक लाख रुपये कमवते. लग्नाच्या दिवशीच नवरदेवाच्या बहिणीची अजब मागणी; सगळेच हैराण, मंडपातच तुटलं नातं जॅस्मिनचे फॅन बहुदा तिच्याकडून मॅचिंग ब्रा आणि पँटी खरेदी करतात. सर्वाधिक काळ्या आणि लाल रंगाच्या अंडरवियर्सला मागणी असते. तिनं सांगितलं, की तिच्या ग्राहकांना तिच्या खासगी आयुष्यासोबत काहीही घेणं देणं नाही. ती आपल्या कामामुळे अतिशय आनंदात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात