लंडन 13 सप्टेंबर : नुकतंच एक हैराण करणारं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या घटनेत एका पतीच्या पायाखालची जमीनच सरकली जेव्हा त्याला समजलं की त्याच्या पत्नीनं एका अश्लील वेबसाईटवर (Profile on Pornographic Website) आपलं प्रोफाईल बनवलं आहे. आपल्या पत्नीचं प्रोफाईल पाहून पतीला धक्काच बसला (Wife is Cheating on Husband). ही घटना यूनायटेड किंगडममधील (United Kingdom) आहे.
पतीसोबत संबंध ठेवणाऱ्या बहिणीची महिलेनं ऑफिसमध्येच केली धुलाई; Shocking Video
द सननं दिलेल्या वृत्तानुसार, 19 वर्षाआधी या व्यक्तीचं संबंधित महिलेसोबत लग्न झालं होतं. मात्र, त्याला याबाबत भनकदही नव्हती की त्याची पत्नी त्याचा विश्वासघात करून इतर पुरुषांसोबत संबंध ठेवत आहे. या व्यक्तीनं सांगितलं, की त्याचं वय 50 वर्ष आहे तर त्याच्या पत्नीचं 47 वर्ष
या व्यक्तीला असं वाटतं, की कदाचित तो आपल्या पत्नीला आनंदी ठेवू शकलेला नाही. दोन महिन्यांआधी त्यांच्या घरी काहीतरी कामासाठी एक मॅकेनिक आला होता. त्याचं वय सुमारे ३० वर्ष होतं आणि तो एकदम फीट होता. या व्यक्तीची पत्नी मॅकेनिकसोबत फार हसून बोलत होती. ती त्याच्याकडे एकटक पाहतही होती. यासोबतच वारंवार त्याला चहा आणि इतर खाण्या-पिण्याच्या गोष्टी ऑफर करत होती. त्याच दिवशी पहिल्यांदा आपल्या पत्नीवर संशय आल्याचं या व्यक्तीनं सांगितलं.
बापरे..! कोब्रा नागानं गिळली घोणस; विषारी सापाची दुसऱ्या विषारी सापाकडून शिकार
पतीनं सांगितलं, की त्याच्या पत्नीचा खरा कारनाम तर टॅबलेटमुळे समोर आला. या व्यक्तीनं सांगतिलं, की एक दिवस त्यानं लपून आपल्या पत्नीचा टॅबलेट चेक केला. तेव्हाच त्याला समजलं की त्याच्या पत्नीनं अश्लील वेबसाईटवर स्वतःचं प्रोफाईल बनवलं आहे. या वेबसाईटवरुन ती तीन जणांसोबत बोलत असे. हे सर्व वयानं तिच्यापेक्षा कमी होते.
या व्यक्तीनं सांगितलं, की माझ्या पत्नीवर माझा पूर्ण विश्वास होता. सुरुवातीला तर माझा विश्वासच बसला नाही की माझी पत्नी मला धोका देऊ शकते. मात्र, आता मला हे सत्य स्वीकारून याच्यासोबतच जगावं लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Porn sites, Viral news