मराठी बातम्या /बातम्या /Viral /कर्मानेच मेला! पादचाऱ्याला उडवणाऱ्या बाईकस्वाराचा भयानक अंत; पुण्यातील धक्कादायक VIDEO

कर्मानेच मेला! पादचाऱ्याला उडवणाऱ्या बाईकस्वाराचा भयानक अंत; पुण्यातील धक्कादायक VIDEO

पुण्याच्या रस्त्यावर भयंकर अपघात

पुण्याच्या रस्त्यावर भयंकर अपघात

पुण्याच्या रस्त्यावरील भयंकर अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 26 मार्च : तुम्ही जी कर्म करता, त्याची फळं तुम्हाला इथंच भोगावी लागतात, असं म्हणतात. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. एका बाईकस्वाराने पादचाऱ्याला उडवलं. त्याच्या पुढच्याच क्षणी बाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे. बाईकस्वार तरुणासोबत असं काही घडलं की त्याचा जीव गेला आहे. पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधील ही घटना आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे परिसरात भयंकर अपघात झाला आहे. अपघाताचं हे दृश्य रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, काही गाड्या रस्त्याने जात आहेत. रस्त्याच्या कडेने काही लोक चालत आहेत. इतक्यात एक भरधाव बाईक येते आणि एका पादचाऱ्याला उडवते. त्यानंतर जे घडतं ते यापेक्षाही धक्कादायक आहे.

पादचाऱ्याला उडवणारा बाईकस्वार पुढे जातो आणि त्याचंही गाडीवरील निंयंत्रण सुटतं, तोसुद्धा बाईकसह खाली कोसळतो. रस्त्याच्या मधोमध पडतो. इतक्यात मागून एक डंपर येतो आणि या बाईकस्वारावरून जातं.

VIDEO - मुलाच्या शाळेत गोळीबाराचं LIVE Reporting करत होती आई; लेकाबाबतच असं काही समजलं की...

डंपर बाईकस्वाराला चिरडतो. डंपरच्या चाकाखाली आल्याने या बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करू नये, गाड्या चालवताना काळजीपूर्व चालवाव्यात असं वारंवार सांगितलं जातं. पण बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात. ट्रॅफिक रूलचं सर्रास उल्लंघन करतात. हा बाईकस्वारही भरधाव वेगाने गाडी चालवत होता, या वेगानेच त्याचा जीव घेतला आहे.

First published:
top videos

    Tags: Accident, Local18, Pimpri chinchawad, Pune, Viral, Viral videos