मुंबई, 03 डिसेंबर : राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातल्या खमनौर भागात एका कार अपघाताचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका कारने रस्त्यावर उभा असलेल्या दुसऱ्या कारने जोराची टक्कर दिली. यात उभा असलेल्या कारचा चक्काचूर झाला. या अपघातापूर्वी काही सेकंद आधीच एक चार वर्षांची मुलगी कारमधून उतरून बाजूला गेली होती. यामुळे सुदैवाने चिमुकली बचावली. आता या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चार वर्षांची मुलगी घरासमोर उभा असलेल्या कारमध्ये खेळत होती. मुलगी कारमधून उतरल्यानंतर ७ सेकंदात रस्त्यावरून आलेल्या एका वेगवान कारने उभा असणाऱ्या कारला धडक मारली. ही धडक इतकी जोरदार होती की यामुळे उभा असलेली कार उलटली.
हेही वाचा : 'चोरी करून कसं वाटलं?', चोराने दिलेलं अजब उत्तर ऐकून पोलीस स्टेशनमध्येच पिकला हशा, मजेशीर VIDEO
राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यात २० दिवसांपूर्वी हा अपघात घडला. भागल नावाच्या गावात दुकान मालक त्याच्या नातीसह दुकानाबाहेर बसला असताना एक भरधाव कार वेगाने आली आणि त्यांच्या अल्टो कारला धडकली. या अपघाताआधी अवघ्या १० सेकंदापूर्वी चार वर्षांची चिमुकली अल्टो कारमधून उतरून बाजूला आली होती.
हेही वाचा : पतीला सोडून बहिणीसोबत हनिमूनला गेली नवरी; संपूर्ण सत्य समजताच नवरदेवाची पोलिसांत धाव
चिमुकली तिच्या आजोबांजवळ पोहोचला क्षणीच पाठीमागून रस्ता सोडून भरधाव कार थेट उभा असणाऱ्या कारला धडकली. अचानक घडलेल्या या अपघाताने सर्वांनाच धक्का बसला. तर चिमुरडी तेव्हा झालेल्या मोठ्या आवाजाने रडू लागली. व्हायरल व्हिडीओ पाहता चिमुरडीचं नशीब बलवत्तर म्हणून ती बचावली असंच म्हटलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rajasthan, Rajsthan, Shocking accident, Video viral, Viral video.