मराठी बातम्या /बातम्या /Viral /'चोरी करून कसं वाटलं?', चोराने दिलेलं अजब उत्तर ऐकून पोलीस स्टेशनमध्येच पिकला हशा, मजेशीर VIDEO

'चोरी करून कसं वाटलं?', चोराने दिलेलं अजब उत्तर ऐकून पोलीस स्टेशनमध्येच पिकला हशा, मजेशीर VIDEO

चोरी केल्यावर कसं वाटतं? असा प्रश्न पोलीस अधिक्षकांनी या चोराला विचारला होता. त्यावर चोरानं दिलेलं उत्तर ऐकून नक्कीच हसायला येईल.

चोरी केल्यावर कसं वाटतं? असा प्रश्न पोलीस अधिक्षकांनी या चोराला विचारला होता. त्यावर चोरानं दिलेलं उत्तर ऐकून नक्कीच हसायला येईल.

चोरी केल्यावर कसं वाटतं? असा प्रश्न पोलीस अधिक्षकांनी या चोराला विचारला होता. त्यावर चोरानं दिलेलं उत्तर ऐकून नक्कीच हसायला येईल.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Chhattisgarh, India

    नवी दिल्ली 03 डिसेंबर : तुमच्यापैकी अनेकांनी रॉबिनहूडची गोष्ट वाचली किंवा ऐकली असेल. हा रॉबिनहूड श्रीमंतांच्या घरी चोरी करून तो मुद्देमाल गरिबांना वाटायचा, अशी दंतकथा आहे. छत्तीसगड पोलिसांना नुकताच अशाच एका चोराचा अनुभव आला. आपण चोरी करून त्या पैशातून गरिबांना आणि प्राण्यांना जीवनावश्यक वस्तू दिल्याचा दावा, या चोरानं केला आहे. चोरी केल्यावर कसं वाटतं? असा प्रश्न पोलीस अधिक्षकांनी या चोराला विचारला होता. त्यावर चोरानं दिलेलं उत्तर ऐकून नक्कीच हसायला येईल. पोलीस अधिक्षकांसह उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनाही हसू आवरता आलेलं नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    '5 डिसेंबरला रात्री 8 वाजता...'; आईबाबत धक्कादायक भविष्यवाणी करत शिक्षकाचा शाळेत सुट्टीसाठी अर्ज

    हे प्रकरण छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील आहे. छत्तीसगड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी छापे टाकून चोरट्यांची टोळी पकडली होती. या चोरट्यांची चौकशी करताना पोलीस अधीक्षकांनी एका चोराला विचारलं की, 'चोरी केल्यावर कसं वाटलं?' या प्रश्नाला चोरांनं ज्या टोनमध्ये उत्तर दिलं ते ऐकून सर्वांना हसू अनावर झालं. 'चोरी करताना मला बरं वाटलं पण नंतर चुकीचं काम केल्यामुळे पश्चातापही झाला' असं उत्तर चोरानं दिलं. त्यानंतर तो चोर सांगतो की, चोरीतून त्याला 10 हजार रुपये मिळाले होते. हे पैसे त्याने गायी, श्वान आणि रस्त्याच्या कडेला बसलेल्या गरिबांना ब्लँकेट आणि अन्न देण्यासाठी खर्च केले. तो खोटं बोलत आहे हे सर्व पोलिसांना माहिती होतं. पण, त्याची उत्तर देण्याची पद्धत बघून पोलीस अधिकाऱ्यांसह सर्वजण हसले.

    2 डिसेंबर रोजी @Gulzar_sahab ट्विटर हँडलवर या चोराचा व्हिडिओ शेअर केला होता. 'दिलदार चोर', असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. या क्लिपला आतापर्यंत एक लाख 32 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 10 हजार लाईक्स मिळाले आहेत. 33 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी चोराची चौकशी करत असल्याचे तुम्ही पाहू शकता. चोर त्याच्याच शैलीत उत्तर देतं आहे.

    अंजलीच्या वेडिंग फोटोशूटमध्ये हत्तीचा धूमाकूळ; धक्कादायक VIDEO VIRAL

    काही युजर्सनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर विविध मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. बहुतेकांनी खळखळून हसण्याच्या इमोजी कमेंट सेक्शमध्ये पोस्ट केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल.

    First published:

    Tags: Thief, Viral video.