• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • जीव वाचवणारा ACCIDENT; एक अपघातही कशी वाचवू शकतो लाइफ पाहा घटनेचा LIVE VIDEO

जीव वाचवणारा ACCIDENT; एक अपघातही कशी वाचवू शकतो लाइफ पाहा घटनेचा LIVE VIDEO

अपघातामुळे जीव गेला नाही तर जीव वाचला आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 नोव्हेंबर : अपघात (Accident) म्हणजे तो जीवघेणाच  (Accident video). त्यामुळे अपघात जीव कसा काय वाचवू शकतो (Accident saved life), असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. पण म्हणतात ना, 'कभी कभी दाग भी अच्छे होते है', किंवा जे काही वाईट घडतं ते चांगल्यासाठीही घडतं, तसंच अपघातही क्वचित प्रसंगी चांगला ठरू शकतो (Life saving accident). याचाच प्रत्यय देणारा एका व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे. जिथं अपघातामुळे जीव गेला नाही तर जीव वाचला आहे. दोन कारची टक्कर झाल्यानंतर जीव जाण्याऐवजी जीव वाचला आहे. आता हे कसं काय शक्य आहे, असंच तुम्ही म्हणाल. तर  एका व्यक्तीने मुद्दामहून हा अपघात घडवून आणला. अपघात घडवून त्याने दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचवला आहे. या घटनेचा लाइव्ह व्हिडीओ समोर आला आहे. तुम्हाला फक्त वाचून विश्वास बसणार नाही, तर तुम्ही स्वतःच हा व्हिडीओ पाहा. व्हिडीओत पाहू शकता एक कार रस्ता सोडून बाजूच्या मार्गाने जाते आहे. कारचालक बेशुद्ध झाला होता, कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी तशीच पळत होती. कार रेलिंगलाही धडकते पण तरी ती चालते. हळूहळू कार रस्त्याच्या मध्ये येते. हे वाचा - Blind turn वर तरुणाने सुसाट पळवली बाईक आणि...; VIDEO पाहून भरेल धडकी थोडं पुढे गेल्यानंतर एक व्यक्ती आपली गाडी मुद्दामहून या नियंत्रण सुटलेल्या कारच्या पुढे आणते. नियंत्रण सुटलेली कार त्या गाडीला धडकते, तेव्हा कुठे ती कार थांबते. दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी या व्यक्तीने आपल्या कारच्या नुकसानाची पर्वा केली नाही. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. दोन कारची धडक झाली म्हणूनच मोठी दुर्घटना टळली. हे वाचा - अरारारा खतरनाक VIDEO! कधीच पाहिली नसेल इतकी वेगवान फूड डिलीव्हरी ही घटना नेदरलँडमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. शुक्रवारी दुपारी नूनपीटमध्ये ही घटना घडली. या कारमागे असलेल्या गाडीतील डॅशकॅममध्ये अपघाताचं हे दृश्य कैद झालं. Buitengebieden ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एका ड्रायव्हरला वाचवण्यासाठी व्यक्तीने आपल्या कारची बळी दिली, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published: