जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अरारारा खतरनाक Video! कधीच पाहिली नसेल इतकी वेगवान Food delivery

अरारारा खतरनाक Video! कधीच पाहिली नसेल इतकी वेगवान Food delivery

अरारारा खतरनाक Video! कधीच पाहिली नसेल इतकी वेगवान Food delivery

फूड डिलीव्हरीचा खतरनाक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो तुम्ही कधीच पाहिला नसावा.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 नोव्हेंबर : सध्या बहुतेक लोक घरीच फूड ऑर्डर (Online food) करतात. ऑनलाइन फूड मागवलं जातं आणि मग डिलीव्हरी (Food delivery) बॉय ते फूड पोहोचवतात. तुम्ही फूड ऑर्डर केल्यानंतर ते तुमच्याकडे अगदी कमीत कमी वेळेत पोहोचवण्यासाठी डिलीव्हरी बॉयजची धडपड सुरू असते. त्यामुळे ते वेगाने बाईक चालवतात हे आपल्याला माहितीच आहे. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) अशा फूड डिलीव्हरीचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे, जो तुम्ही कधीच पाहिला नसावा. गाड्यांवरून होणारी वेगवान फूड डिलीव्हरी तर तुम्हाला माहितीच आहे. पण ही फूड डिलीव्हरी पाहून तुम्ही थक्कच व्हाल. रस्त्याच्या एका बाजूला विक्रेता आणि दुसऱ्या बाजूला ग्राहक आणि मधून जाणाऱ्या गाड्या. अशा परिस्थितीत विक्रेत्याने ज्या पद्धतीने ग्राहकापर्यंत फूड पोहोचवलं ते एकदा पाहाल तर पाहतच राहाल.

जाहिरात

व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर एक व्यक्ती फूड बनवताना दिसते आहे. कढईत ती काहीतरी शिजवते. त्यानंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक तरुण हातात प्लेट धरून उभा आहे. सामान्यपणे आपल्याला काही खायचं असेल तर आपण त्या विक्रेत्याच्या जवळ जातो. पण हा तरुण तिथेच उभा राहिला. हे वाचा -  पाणी नव्हे तर Fanta मध्ये शिजवली मॅगी; अजब रेसिपी पाहून चक्रावून जाल, VIDEO ग्राहकाने दुरूनच विक्रेत्याला इशारा केला. त्यानंतर विक्रेत्यानेही गॅसवरील गरम कढई उचलली. कढई एका हातात धरली आणि ती हवेत उडवून त्यातील पदार्थ ग्राहकाच्या दिशेने भिरकावला. जो अगदी बरोबर रस्त्याच्या पलिकडे असलेल्या ग्राहकाच्या डिशमध्ये जाऊन पडला. त्यानंतर ग्राहक तिथून निघून गेला. beutefullplacee इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा -  सँडविच खाताच तरुणीची झाली भयंकर अवस्था; थेट ICU मध्ये दाखल, सांगितला अनुभव काय मग ही सर्वात वेगवान फूड डिलीव्हरी आहे की नाही? अशी फूड डिलीव्हरी तुम्ही कधी पाहिली आहे का? हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया जरूर आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात