मराठी बातम्या /बातम्या /Viral /Blind turn वर तरुणाने सुसाट पळवली Bike आणि...; VIDEO पाहून भरेल धडकी

Blind turn वर तरुणाने सुसाट पळवली Bike आणि...; VIDEO पाहून भरेल धडकी

ब्लाइंड टर्नवर हिरोगिरी करायला गेला तरुण आणि...

ब्लाइंड टर्नवर हिरोगिरी करायला गेला तरुण आणि...

ब्लाइंड टर्नवर हिरोगिरी करायला गेला तरुण आणि...

मुंबई, 22 नोव्हेंबर : लोकांचा जीव धोक्यात येऊ नये, यासाठी ट्राफिकचे काही नियम (Traffic rule) असतात. रस्त्यावर अशा वाहतुकीच्या नियमांचे बोर्डही (Sign board on road) लावलेले दिसतात. पण किती तरी लोक त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा हिरोगिरी दाखवण्यासाठी मुद्दामहून त्या नियमांचं उल्लंघन करताना दिसतात आणि त्यामुळे अपघात होतात (Accident video). सध्या अशाच एका बाईकचालकाचा धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे (Bike and car accident video). ज्याने भलतीच डेअरिंग केली आणि पुढे जे घडलं ते पाहून तुमच्या काळजाचा ठोकाच चुकेल (Shocking video).

रस्त्यावर वळण असल्यास तिथं गाडीचा वेग कमी करावा लागतो. पण या बाईकस्वाराने गाडीचा वेग कमी करण्याऐवजी वाढवला आणि त्याने सुसाट बाईक पळवली. ब्लाइंड टर्नवर त्याने वेगाने बाईक चालवली आणि त्याचवेळी समोरून एक कारही आली. बाईक आणि कार अगदी एकमेकांच्या समोरासमोर आले. पुढे काय घडलं ते तुम्हीच व्हिडीओत पाहा.

View this post on Instagram

A post shared by Rapid DP 🔥 (@rapiddenny)

व्हिडीओत पाहू शकता बाईक-कार समोरासमोर आली. दोन्ही गाड्यांमध्ये फक्त किंचितसं अंतर होतं. आता या गाड्यांची टक्कर होणार असंच वाटतं. पण सुदैवाने तसं होत नाही. जर या गाड्यांची टक्कर झाली असती तर दोन्ही गाड्या डोंगरावरून खाली दरीतही कोसळल्या असत्या. या बाईकस्वाराचं नशीब चांगलं म्हणून मोठी दुर्घटना होता होता टळली. तो मोठ्या अपघातातून बचावला. पण प्रत्येकाचं नशीब प्रत्येक वेळी साथ देईलच असं नाही. त्यामुळे तुम्ही अशी चूक बिलकुल करू नका.

हे वाचा - परेड सुरू असताना गर्दीत शिरली SUV; चिरडून अनेकांचा मृत्यू, धक्कादायक VIDEO

rapiddenny  नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.

First published:
top videos

    Tags: Accident, Bike accident, Viral, Viral videos