मराठी बातम्या /बातम्या /Viral /फेक वेडिंग फोटोशूट; नवरा मुलगाही भाड्याने घेतला, एक्स-बॉयफ्रेंडशी बदला घेण्यासाठी तिने केलं असं काही....

फेक वेडिंग फोटोशूट; नवरा मुलगाही भाड्याने घेतला, एक्स-बॉयफ्रेंडशी बदला घेण्यासाठी तिने केलं असं काही....

एक्स-बॉयफ्रेंडचं लक्ष वेधण्यासाठी तिने हा सगळा घाट घातला. लग्नाचे कपडे, भाड्याने आणलेला मुलगा आणि या सगळ्यासोबत केलेलं फोटोशूट तिने सोशल मीडियावर शेअर केलं.

एक्स-बॉयफ्रेंडचं लक्ष वेधण्यासाठी तिने हा सगळा घाट घातला. लग्नाचे कपडे, भाड्याने आणलेला मुलगा आणि या सगळ्यासोबत केलेलं फोटोशूट तिने सोशल मीडियावर शेअर केलं.

एक्स-बॉयफ्रेंडचं लक्ष वेधण्यासाठी तिने हा सगळा घाट घातला. लग्नाचे कपडे, भाड्याने आणलेला मुलगा आणि या सगळ्यासोबत केलेलं फोटोशूट तिने सोशल मीडियावर शेअर केलं.

    बर्लिन, 19 मे: टिकटॉक (TikTok) अ‍ॅप जगभरातील सर्वात लोकप्रिय अॅप ठरलं आहे. या टिकटॉकवर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. केवळ मनोरंजनासाठीच नाही, तर टिकटॉकवर अनेकांनी चांगली माहिती, आपले अनुभवही शेअर केले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे, ज्यात एका गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर त्याला पुन्हा आपल्याकडे आणण्यासाधी नेमकं काय-काय केलं याचा खुलासा केला आहे. या टिकटॉकरने ब्रेकअप झाल्याच्या तीन महिन्यानंतर लग्नाचं नाटक केलं.

    Sarah Vilard असं या तरुणीचं नाव आहे. ब्रेकअपनंतर तिने खोटं लग्न करुन, केवळ लग्न झाल्याचं नाटक केल्याचं सांगितलं. Sarah ही जर्मनीतील 24 वर्षीय विद्यार्थी आहे. 2019 मध्ये तिचं आणि तिच्या बॉयफ्रेंडचं ब्रेकअप झालं होतं. ब्रेकअप झाल्याच्या तीन महिन्यानंतर तिने, बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी, त्याला तिचं ल्गन झाल्याचं भासवलं.

    Olympic Champion चा ब्रेस्टफीडिंग करत शीर्षासन करणारा फोटो VIRAL

    तिने केवळ लग्न झाल्याचं केवळ सांगितलं नाही, तर ते खरंच झालं आहे असं भासवण्यासाठी तिने वेडिंग ड्रेस विकत घेतला. एवढ्यावरचं ती थांबली नाही, तर तिने एक मुलगाही भाड्याने घेतला, जो तिचा नवरा असल्याचं दाखवण्यात आलं. त्यानंतर दोघांनी लग्न झाल्याचं फोटोशूटही केलं.

    तिने या खोट्या लग्नासाठी किती पैसे खर्च केलं ते सांगितलं नाही. पण एक्स-बॉयफ्रेंडचं लक्ष वेधण्यासाठी तिने हा सगळा घाट घातला. लग्नाचे कपडे, भाड्याने आणलेला मुलगा आणि या सगळ्यासोबत केलेलं फोटोशूट तिने सोशल मीडियावर शेअर केलं. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एक्स-बॉयफ्रेंडचं लक्ष वेधण्यासाठी केलेला हा सगळा खटाटोप कामी आल्याचं तिने सांगितलं.

    घृणास्पद! Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL

    त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मला शोधलं आणि लगेच दुसऱ्याच दिवशी मला मेसेजही केला. आम्ही एकत्र असताना मी त्याला फसवत आहे, असं त्याला वाटलं असल्याचं Sarah Vilard ने सांगितलं.

    परंतु मी त्याची फसवणूक केली नव्हती. तो माझ्या घरी आला. या संपूर्ण प्रकणाबद्दल त्याला माझ्याशी बोलायचं होतं. परंतु आता मला यात काहीही रस नव्हता, असंही ती म्हणाली. परंतु त्याचा बदला घेण्यासाठीचे तिने केलेले प्रयत्न यशस्वी झाले होते.

    प्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली

    तिने लग्न केल्याचं एक्स-बॉयफ्रेंडला भासवल्यानंतर, मात्र तिने तिचे ते फोटो सोशल मीडियावरुन काढून टाकले. तसंच त्याला सर्व सोशल प्लॅटफॉर्मवर ब्लॉक केल्याचंही तिने सांगितलं. तसंच आता मी सिंगल असून माझ्या आयुष्यात आनंदी असल्याचंही तिने म्हटलं. गेल्या आठवड्यात तिने तिचा हा अनुभव शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिच्या या व्हिडीओला 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

    First published:
    top videos

      Tags: Boyfriend, Break up