कंपाला, 18 मे : फॅन्स (Fans) अनेकदा आपल्या आवडत्या स्टार्सना अत्यंत वाईट वागणूक देतात. त्यामुळे बऱ्याचदा अशा चाहत्यांना स्टार्सकडून कडक प्रत्युत्तर मिळतं. असंच काहीसं एक महिला गायिकाने (Female Singer) प्रत्युत्तर दिलं आहे. स्टेजवर परफॉमन्स करताना चाहत्याने महिला सिंगरचा प्रायव्हेट पार्टवर स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. यावर सिंगरने त्याला असा धडा शिकवला की, यापुढे तो असं अश्लील कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. युगांडाच्या सिंगरसोबत झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला गायिका स्टेजवर सादरीकरण करीत होती, तेव्हा एका फॅनने गायिकेचा प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चिडलेल्या गायिकेने त्या व्यक्तीला दोन लाथा मारल्या. गायिकेकडून असं कडक उत्तर दिल्याने लोक तिचं कौतुक करीत आहे. हा व्हिडिओ lindaikejiblogofficial नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. ही नायजेरियाची एक मनोरंजन वेबसाइट आहे.
View this post on Instagram
हे ही वाचा-नवरीच्या घरात सुरू होती लग्नाची धावपळ; 2 नवरदेवांच्या वराती पाहून वऱ्हाडी शॉक
इन्स्टाग्रामवर एका नायजेरियन वेबसाइटद्वारा दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दक्षिणी सूडान येथील आहे. येथे युगांडाची (Uganda) महिला गायिका वेरॉनिका लगया (Veronica Luggya) लाइव्ह परफॉर्मन्स देत होती. यादरम्यान एक चाहता स्टेजजवळ आला आणि वेरॉनिकाच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. चिडलेल्या वेरॉनिकाने वेळ न घालवता या व्यक्तीला दोन वेळा लाथा घातल्या आणि त्याला मागे केलं. इतकच नाही या घटनेदरम्यान त्यांनी आपलं परफॉर्मेंन्सदेखील सुरू ठेवले. मिळालेल्या माहितीनुसार वेरॉनिकाला एक मूल आहे. ईदच्या निमित्ताने तिने दक्षिणी सूडानमध्ये अनेक परफॉमन्सेस दिले होते. एका कार्यक्रमादरम्यान फॅनने तिच्यासोबत हे कृत्य केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PRIVATE part, Singer