ऑस्ट्रेलियन ऑलंपिक चॅम्पियन (Australia Olympic Champion) टोरा ब्राइट (Torah Bright) तिच्या इन्स्टाग्राम पोस्ट (Instagram Post) नंतर चर्चेत आली आहे. तिने शिर्षासन करताना आपल्या मुलाला ब्रेस्टफिडींग (Breastfeeding) करत असल्याचा फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर हा फोटो व्हायरल झाला आणि तिचं ट्रोलिंग (Trolling) सुरु झालं.
34 वर्षांची टोरा ब्राइट ऑस्ट्रेलियातील (Australia) सर्वात यशस्वी स्नोबोर्डर ऍथलीट्स (Snowboarder Athletes) मानली जाते. ती ऑस्ट्रेलियातील सर्वात यशस्वी विंटर ऑलंपियन आहे. तिने दोन वेळा एक्स गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे. तर, तीन वेळा यूएस ओपन जिंकली आहे. तीन वेळा वर्ल्ड सुपरपाईप चॅम्पियनशिप आणि दोन वेळा ग्लोबल ओपन चॅम्पियन मिळवली आहे.