Home /News /viral /

एकसोबतच 20 महिलांना डेट करत होता व्यक्ती; सोशल मीडियावरील एका व्हिडिओमुळे फुटलं बिंग

एकसोबतच 20 महिलांना डेट करत होता व्यक्ती; सोशल मीडियावरील एका व्हिडिओमुळे फुटलं बिंग

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर न्यूयॉर्कमधील तब्बल 20 महिलांना आपल्यासोबत झालेली फसवणूक समजली. त्यांना समजलं की त्या सगळ्या एकाच व्यक्तीला डेट करत होत्या

    नवी दिल्ली 23 जानेवारी : सोशल मीडियाचा (Social Media) खरं काम अनोळखी लोकांना भेटणं, हे आहे. मात्र, प्रत्यक्षात असंच फारच कमी पाहायला मिळतं. मात्र, सध्या न्यूयॉर्कमधून एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हीही म्हणाल की खरंच सोशल मीडियामध्ये इतकी ताकद आहे की तो अनोळखी लोकांनाही एकत्र आणू शकतो. या घटनेत एका व्हायरल व्हिडिओमुळे (Viral Video) अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील काही महिलांना समजलं की त्या सगळ्या एकाच व्यक्तीला डेट करत होत्या. VIDEO - 14 फूट अजगरासह शेकडो सापांनी घातला विळखा; भयंकर अवस्थेत सापडली व्यक्ती द इंडिपेंडंट साईटच्या वृत्तानुसार, या संपूर्ण घटनेची सुरुवात झाली, टिकटॉकवर व्हायरल (Tiktok Video) झालेल्या एका व्हिडिओपासून. मागील मंगळवारी टिकटॉक यूजर मिमी शाओने एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात तिने सांगितलं की ती कॅलेब नावाच्या एका व्यक्तीला डेट करत होती. मात्र, तो अचानक गायब झाला आणि तिच्यासोबतचा संपर्कही तोडला. आपल्या व्हिडिओमध्ये मिमीने सांगितलं की अनेक महिला तिला विचारत आहे, की ती वेस्ट एल्म कॅलेब नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत आहे का. मिमीला वाटलं की त्या दुसऱ्याच कॅलेबबद्दल बोलत आहेत. मात्र, एकसोबतच इतक्या महिला एकाच नावाच्या व्यक्तीबद्दल तपास करत असल्याचं जाणून तिच्या मनात उत्सुकता निर्माण झाली (Man Dating Multiple Women). तेव्हा तिने व्हिडिओ बनवला आणि महिलांना सावध केलं की वेस्ट एल्म कॅलेब नावाच्या एका व्यक्तीपासून दूर राहा, तो धोका देत आहे. या व्यक्तीला वेस्ट एल्म कॅलेब नाव यासाठी देण्यात आलं कारण तो एका फर्निचर कंपनीमध्ये काम करत होता, ज्याचं नाव असंच होतं. फक्त एक KISS आणि बॉयफ्रेंडचा खेळ खल्लास; गर्लफ्रेंडने शेअर केला Video हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर न्यूयॉर्कमधील तब्बल 20 महिलांना आपल्यासोबत झालेली फसवणूक समजली. त्यांना समजलं की त्या सगळ्या एकाच व्यक्तीला डेट करत होत्या, ज्याचं नाव वेस्ट एल्म कॅलेब असं होतं. या व्यक्तीने या सगळ्यांना डेट केलं आणि अचानकच गायब झाला. त्याने काहीही माहिती दिली नाही, की तो कुठे जात आहे. सोशल मीडियावर #WestElmCaleb हॅश्टॅग ट्रेंड होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक महिलांनी आपला व्हिडिओ शेअर करत लोकांना माहिती दिली की त्या याच व्यक्तीला डेट करत आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Dating app, Love story

    पुढील बातम्या