वॉशिंग्टन, 22 जानेवारी : साप म्हटलं तरी अंगाला घाम फुटतो. एकच साप समोर दिसला तरी काळजाचं पाणी पाणी होतं. विचार करा असा एक नव्हे तर शेकडो साप तुमच्या समोर आले तर काय होईल. अमेरिकेतील (America) असंच एक धक्कदायक प्रकरण समोर आलं आहे. शंभरपेक्षा अधिक सापांनी एका व्यक्तीला विळखा घातलं
(More than 100 snakes python surrounded person). त्यानंतर भयंकर अवस्थेत ही व्यक्ती सापडली.
मेरीलँडमध्ये (Maryland) 19 जानेवारीला ही घटना समोर आली. एका घरात राहणारी 49 वर्षांची व्यक्ती बरेच दिवस घराबाहेर दिसली नाही, याबाबत त्याच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले. चार्ल्स काऊंट शेरिफ ऑफिसमार्फत (Charles County Sheriff’s Office) याबाबत एक प्रेस रिलीजही जारी करण्यात आलं आहे.
हे वाचा - अरे बापरे! जंगल सफारीवेळी पर्यटकांच्या गाडीतच घुसला सिंह; थरकाप उडवणारा VIDEO
तपासात या व्यक्तीच्या आसपास 100 पेक्षा जास्त साप असल्याचं दिसून आलं. चार्ल्स काऊंटी अॅनिमल कंट्रोलने सापांना पकडलं आहे.
अॅनिमल कंट्रोलचे प्रवक्ते जेनिफर हॅरिस यांनी Wusa 9 शी बोलताना सांगितलं, जवळपास 125 साप या व्यक्तीच्या घरात आणि घराबाहेर सापडले. घरात सर्वात लांब 14 फूट लांबीचा बर्मिस पायथनही सापडला आहे. अमेरिकेत इतक्या संख्येने साप मिळण्याचं प्रकरण तीस वर्षांत कधीच पाहिलं नाही.
हे वाचा - VIDEO - शेळीसाठी जीव घातला धोक्यात; श्वास घेणं मुश्किल अशा खड्ड्यात गेला अखेर...
या व्यक्तीच्या घराजवळ इतके साप आहेत, याबाबत शेजाऱ्यांनाही काहीच माहिती नव्हतं. ही व्यक्ती घरात जमिनीवर तोंडावर पडलेली सापडली. ही व्यक्ती मृत झाली होती. यानंतर मेडिकल सर्व्हिस आणि फायर ब्रिगेडची टीमही तिथं दाखल झाली. त्या व्यक्तीचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.