पियुष शर्मा, प्रतिनिधी मुरादाबाद, 12 जून : डोळे आहेत तर जग आहे, असं म्हटलं जातं. कारण डोळ्यांमुळेच आपण जग पाहू शकतो. परंतु जन्मतःच अंधत्व पदरात पडलेल्या किंवा आयष्याच्या एखाद्या वळणावर नेत्ररोगामुळे अंधत्व आलेल्या व्यक्तींना आजच्या आधुनिक काळात जगाच्या पलिकडचं जग पाहता येतं, असं म्हटलं जातं तेही काही खोटं नाही. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यातील एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने अंध व्यक्तींसाठी एक चमत्कारच घडवला आहे. या विद्यार्थ्यांने असे बूट तयार केले आहेत जे समोरील मार्ग सूचित करतात. शिवाय मार्गात येणाऱ्या अडथळ्यांपासूनही वाचवतात. कृतज्ञ सिंह असं या हुशार विद्यार्थ्यांचं नाव आहे. नावातच कृतज्ञता असलेल्या या विद्यार्थ्याने सांगितलं, ‘मी अंधांसाठी बूट बनवले आहेत. बुटांचं वैशिष्ट्य म्हणजे वाटेत कोणताही अडथळा आल्यास अलार्मच्या माध्यमातून समोर काहीतरी आहे याची जाणीव ते अंध व्यक्तीला करून देतात. त्यामुळे त्यांना चालताना कोणतीही दुखापत होणार नाही. या बुटांमध्ये चार्जिंगची व्यवस्था करून देण्यात आली आहे. बूट घालून तुम्ही जितके जास्त चालाल, तितकं त्याला चार्ज करावं लागेल. तुम्ही चार्जरनेही हे बूट चार्ज करू शकता.’
हे बूट बनवावंसं का वाटलं असं विचारल्यावर कृतज्ञ म्हणाला, ‘मी एका अंध व्यक्तीला रस्त्यावरून फिरताना पाहिलं. तो कशालातरी आदळला आणि पडला. त्याला दुखापत झाली. त्यातून माझ्या मनात अंध लोकांसाठी असं काहीतरी बनवूया जेणेकरून त्यांना चालताना कोणतीही अडचण येऊ नये, असा विचार आला.’ Sukanya Arun Kadam Baby Shower : अरुण कदमच्या लेकीने डोहाळे जेवणासाठी परिधान केला खास दागिना; बाजारात आहे मोठी मागणी दरम्यान, कृतज्ञने केवळ फोनवर संशोधन करून हे बूट तयार केले आहेत. जे अंधांसाठी खूप फायदेशीर ठरतील. त्याचं सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.