मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अरुण कदम म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके दादूस आता आजोबा होणार आहेत.
अरुण कदम यांची लेक सुकन्या अरुण कदम लवकरच आई होणार आहे. काही दिवसांआधीच सुकन्यानं सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिच्या आई होण्याची बातमी दिली होती.
सुकन्या अरुण कदमच्या डोहाळे जेवणाचे फोटो नुकतेच तिनं सोशल मीडियावर शेअर केलेत. फोटोंना अल्पावधतीच चाहत्यांचं प्रेम आणि शुभेच्छा मिळाल्यात.
दरम्यान सुकन्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात फार सुंदर दिसत होती. हिरवी साडी आणि दागिन्यांमध्ये सुकन्याचं आईपण फारच खुललं होतं.
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात फुलांचे सुंदर दागिने तिनं परिधान केले होते. सोबत नाकात नथ, केसात फुलांचे गजरे तिच्यावर फार शोभून दिसत होते.
पण सुकन्यानं डोहाळे जेवणात घातलेल्या एका दागिन्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. तो दागिना म्हणजे तिची सोन्याची टिकली.
चंद्रकोर टिकलीच्या खाली सुकन्यानं सोन्याची चंद्रकोर कपाळावर परिधान केली आहे. त्या चंद्रकोरीवरील छोटे मणी सुकन्याच्या संपूर्ण लुकची शोभा वाढवत होते.
सोन्याची चंद्रकोर ही सध्या बाजारात ट्रेंड करत आहे. लावण्यासाठी अगदी सोपी आणि दिसायला सुंदर, साजेश्या या सोन्याच्या चंद्रकोरीला बाजारात मागणी आहे.