नवी दिल्ली 15 ऑगस्ट : सोशल मीडियावर कपलचे डान्स (Couple Dance Video) व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडिओमध्ये त्यांची जबरदस्त बॉन्डिंग मन जिंकते. तर, काही व्हिडिओ खळखळून हसवणारे असतात. सध्या इन्स्टाग्रामवर पती पत्नीचा एक अतिशय मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Dance Video of Husband and Wife) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. सोशल मीडियावर (Social Media) नवरा बायकोच्या विनोदी व्हिडिओंना भरपूर पसंती मिळताना दिसते. अशा व्हिडिओमध्ये पती आणि पत्नीची जबरदस्त केमिस्ट्री आणि कॉमिक टायमिंग पाहण्यासारखं असतं. मात्र, काही व्हिडिओ पती आणि पत्नीच्या विचित्र करामतींमुळे अगदीच विनोदी होऊन जातात. सध्या व्हायरल होणार व्हिडिओदेखील असाच आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरा आणि बायको आपल्याच नादात मग्न होऊन डान्स करत आहेत. मात्र, इतक्यात महिलेच्या पतीसोबत असं काही घडलं जे पाहून सगळेच हैराण झाले. या डान्स व्हिडिओमध्ये दिसतं, की पती अत्यंत रोमँटिक मूडमध्ये आहे. तो डान्स करतानाच आपल्या पत्नीला किसदेखील करत आहे. इतक्यात अचानक त्याची पॅन्ट निघून खाली येते. यामुळे त्याला पत्नीचा हात सोडून आपली पॅन्ट नीट करावी लागते. मात्र, कॅमेऱ्यासमोर डान्स करणारा हा व्यक्ती या घटनेनंतरही लाजत नाही किंवा थांबत नाही आणि ही परिस्थिती एकदम आरामात सांभाळून नेतो.
हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 5 हजार लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे.