इंदूर, 15 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) इंदूर जिल्ह्यात एका व्यक्तीचं आयुष्य डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्यामुळे उद्ध्वस्त झाली आहे. डॉक्टरांनी या व्यक्तीच्या डोक्यावरील हाड काढलं होतं. मात्र पुन्हा लावण्यासाठी जेव्हा डॉक्टरांना फोन केला तेव्हा लक्षात आलं की, ते हाड नष्ट करण्यात आलं आहे. या प्रकरणात व्यक्तीने डॉक्टरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याचं म्हणणं आहे की, डॉक्टरांमुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.
मिळालेल्या माहितीनुसार, उज्जेनचे किर्ती परमार यांना काही वर्षांपूर्वी ब्रेन ट्यूमर झाला होता. 2019 मध्ये ते शस्त्रक्रिया करण्यासाठी इंदूर येथे खासगी रुग्णालयात आले. शस्त्रक्रियेच्या वेळी त्याच्या डोक्यातील एका भागातील हाड काढण्यात आलं होतं. त्यांनी किर्तीना सांगितलं की, रिकव्हरी झाल्यानंतर पुन्हा हे हाड लावलं जाईल.
हे ही वाचा-Pune : लग्नसमारंभात जास्त हळद लावण्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद; एकाचा गेला जीवडॉक्टर म्हणाले हाड नष्ट केलं..
काही वेळानंतर जेव्हा रुग्ण आपल्या कुटुंबासह त्या रुग्णालयात गेला, तेव्हा सांगण्यात आलं की, त्याचं ते हाड नष्ट करण्यात आलं आहे. ते म्हणाले की, हाड नष्ट करण्यासाठी रुग्णाच्या कुटुंबीयांनी परवानगी दिली होती. तर कुटुंबीयांनी सांगितलं की, त्यांनी केव्हाच अशी परवानगी दिली नाही. तर त्यांना सांगण्यात आलं होतं की, दुसरी शस्त्रक्रिया करताना हे हाड लावलं जाईल.
कुटुंबीयांनी लावले आरोप
रुग्णाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर आरोप लावला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, डोक्याची शस्त्रक्रिया करुन पुन्हा हाड लावण्यासाठीचा खर्च 5 लाखांहून जास्त आहे. या हाडाशिवाय रुग्णाचा चेहरा विचित्र दिसून येत आहे. या प्रकरणात अतिरिक्त पोलिसांनी सांगितलं की, उज्जैन येथे राहणाऱ्या व्यक्तीने खासगी रुग्णालया विरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या या प्रकरणात तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.