मराठी बातम्या /बातम्या /Viral /म्हातारपणी आजीबाईला लागला वेगळाच नाद; ती अजब इच्छा ऐकून घरचेही शॉक

म्हातारपणी आजीबाईला लागला वेगळाच नाद; ती अजब इच्छा ऐकून घरचेही शॉक

82 वर्षाच्या महिलेनं घरातील लोकांनी जेव्हा आपली इच्छा बोलून दाखवली तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही की ही महिला खरं बोलत आहे.

82 वर्षाच्या महिलेनं घरातील लोकांनी जेव्हा आपली इच्छा बोलून दाखवली तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही की ही महिला खरं बोलत आहे.

82 वर्षाच्या महिलेनं घरातील लोकांनी जेव्हा आपली इच्छा बोलून दाखवली तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही की ही महिला खरं बोलत आहे.

नवी दिल्ली 05 नोव्हेंबर : आवड ही मोठी गोष्ट आहे. एखाद्याचं वय जास्त असेल तर याचा अर्थ असा अजिबातही नाही की त्याच्या मनात वेगवेगळे छंद (Weird Hobby) निर्माण होत नाही. सध्या अशीच एक ब्रिटिश महिला (British Grandmother) चर्चेत आहे. 82 वर्षाच्या वयात तिनं शरीरावर पहिला टॅटू गोंदवला आहे (82 Years Old Woman Getting First Tattoo). तिनं घरातील लोकांनी जेव्हा आपली ही इच्छा बोलून दाखवली तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही की ही महिला खरं बोलत आहे.

'हिरोपंती' पडली महागात; बाईक स्टंट करतानाच तरुणाचा अपघात, थरकाप उडवणारा VIDEO

जुडी डेडे आपल्या आयुष्यातील शेवटच्या टप्प्यावर आहे. मात्र, तरीही तिची इच्छा आपल्या शरीरावर आयुष्यातील पहिला टॅटू गोंदवण्याची झाली. तिच्या नातीनं आपल्या आजीचा हा मजेशीर किस्सा TikTok वर शेअर केला. Brandy O’Reilly ने सांगितलं, की आजीची टॅटू गोंदवण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी घरातील अनेक सदस्य तिच्यासोबत टॅटू पार्लरमध्ये पोहोचले.

82 वर्षाची जुडी डेडे जेव्हा टॅटू गोंदवण्यासाठी गेली तेव्हा तिनं हा विचार केला नव्हता की टॅटू कसा असेल. डिझाईनबद्दल ती क्लिअर नव्हती. मात्र, तिला तिच्या नातीची आयडिया आवडली आणि तिनं तसाच टॅटू बनवला जो तिला तिच्या मागील आयुष्यासोबत जोडतो. जुडीने कुठेतरी वाचं की अशा प्रकारचे टॅटू आयुष्य चांगलं जगण्यासाठी मदत करतात. पहिला टॅटू असूनही तिने अत्यंत शूरपणे हा टॅटू गोंदवला आणि याची रिकव्हरीदेखील व्यवस्थित झाली.

दिवाळीसाठी Perfect पोशाख! ताईंच्या LED साडीवरुन नेटकऱ्यांना आठवलं BigB तं गाणं

ब्रांडीनं व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं, की 15 दिवसांनंतर संपूर्ण कुटुंब पुन्हा टॅटू पार्लरमध्ये गेलं आणि त्यांनी आपल्या हातावर त्या लोकांच्या आठणीत टॅटू गोंदवला, ज्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. चार पिढ्यांतील लोक एकसोबतच आपल्या हातावर टॅटू गोंदवत होते. त्यांनी एका म्यूजिक नोटसोबतच हृदय, कॅन्सर रिबन, फिश हुक आणि शांतीचं चिन्ह बनवलं. ही सर्व चिन्हं घरातील त्या लोकांच्या आठवणीत होती, ज्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. यादरम्यान ब्रांडीचा दहा वर्षाचा मुलगादेखील कुटुंबीयांसोबत उपस्थित होता. कारण त्याला माहिती होती की आपली पंजीसाठी हा अत्यंत खास दिवस आहे.

First published:
top videos

    Tags: Tattoo, Viral news