दिवाळीचा (Diwali 2021) सण हा रंगांचा सण म्हणूनही ओळखला जातो. घरादारांसमोर दिव्यांच्या माळा आणि घराभोवती रंगाने सजलेली रांगोळी ही दिवाळीची खूणच म्हणा ना. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचं (Corona Virus) सावट असल्याने सण-उत्सव साजरा करताना अधिक काळजी घेतली जात आहे. यंदा कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात असली तरीही तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी गर्दी करण्याचे टाळण्याचं आवाहन केलं जात आहे. (video of a woman wearing a LED light saree is doing rounds on social media)
हे ही वाचा-Diwali 2021 : दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी 'या' गोष्टी करा
अशातच दिवाळीच्या निमित्ताने एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी LED साडीमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.
हा व्हिडीओ समोप आल्यानंतर नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांच्या गाण्याचा उल्लेख केला आहे. सारा जमाना..या गाण्यात देखील अमिताभ बच्चन यांनी अंगावर LED कपडे घातले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diwali 2021, Diwali Fashion, Video viral