मराठी बातम्या /बातम्या /Viral /अरे बापरे! बाल्कनीत कपडे सुकवताना 19 व्या मजल्यावरून वृद्धेचा तोल गेला आणि...; भयंकर दुर्घटनेचा Live video

अरे बापरे! बाल्कनीत कपडे सुकवताना 19 व्या मजल्यावरून वृद्धेचा तोल गेला आणि...; भयंकर दुर्घटनेचा Live video

बाल्कनीत कपडे सुकवता सुकवता 82 वर्षीय महिलेचा पाय घसरून ती 19 व्या मजल्यावरून कोसळली.

बाल्कनीत कपडे सुकवता सुकवता 82 वर्षीय महिलेचा पाय घसरून ती 19 व्या मजल्यावरून कोसळली.

बाल्कनीत कपडे सुकवता सुकवता 82 वर्षीय महिलेचा पाय घसरून ती 19 व्या मजल्यावरून कोसळली.

बीजिंग, 24 नोव्हेंबर : उंच उंच इमारतीत राहायला कुणाला आवडणार नाही. अशा इमारतीच्या बाल्कनीत जाऊन हवेची झुळूक अंगावर घेण्यापेक्षा दुसरा आनंद कुठलाच नाही. पण अशा उंच इमारतीच्या बाल्कनीत जाताना काळजीही घ्यायला हवी (Woman fell from building). नाहीतर आपली एक छोटीशी चूक जीवावरही बेतू शकते. नुकतीच अशी एक घटना घडली आहे. एक वृद्ध महिला इमारतीच्या 19 मजल्यावरून कोसळली आहे (Old Woman fell from 19th floor balcony).

चीनच्या (China) जियांग्सु प्रांतातील (Jiangsu Province) यंग्ज़हौ (Yangzhou) ही धक्कादायक घटना आहे. इमारतीच्या 19 व्या मजल्यावर राहणारी 82 वर्षांची महिला बाल्कनीत  कपडे सुकवण्यासाठी आली. कपडे सुकवत असताना तिचा पाय घसरला आणि तोल गेला. बाल्कनीतून ती थेट खाली कोसळली. ही संपूर्ण दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

व्हिडीओत पाहू शकता महिलेचे दोन्ही पाय अठराव्या मजल्याच्या बाल्कनीतील कपड्यांच्या रॅकमध्ये अडकले होते आणि तिचं शरीर सतराव्या मजल्यावरील बाल्कनीवर लटकलेलं आहे.

हे वाचा - एका गाडीला धडकून दुसऱ्या गाडीच्या छतावर चढली चारचाकी; विचित्र अपघाताचा VIDEO

बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. तिला अठराव्या आणि सतराव्या मजल्यावरून दोन्ही बाजूने पकडण्यात आलं. एक सुरक्षा दोरी बांधली. सतराव्या मजल्यावर असलेल्या लोकांनी तिला वर उचललं आणि अठराव्या मजल्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी तिला वर खेचून घेतलं. सुरक्षिररित्या तिला मृत्यूच्या दारातून बाहेर काढण्यात आलं. सुदैवाने तिला कोणतीही दुखापत झालेली नाही.

पुण्यातही आठव्या मजल्यावरून कोसळून महिलेचा मृत्यू

सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात पुण्यातही अशीच एक घटना घडली होती.  आठव्या मजल्यावर असलेल्या घराच्या गॅलरीत कपडे वाळू घालत असताना 50 वर्षीय महिलेचा तोल जाऊन ती कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार,  पुण्यातील आंबेगाव (pune ambegaon )  खुर्दमधील दत्तनगर भागात असलेल्या बहुमजली लेकवुड (lakewood society ambegaon) या नामांकित सोसायटीत ही घटना घडली.  केसरीदेवी हरिजी सिंग (वय 55) असं या मृत महिलेचं नाव आहे.

हे वाचा - VIDEO - इटुकली पिटुकली Snowboarder; अवघ्या 11 महिन्याच्या चिमुकलीचं स्नोबोर्डिंग

सिंग कुटुंबीय हे मुळचे उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहे. पुण्यात त्यांच्या मुलाचे लेकवुड सोसायटीत आठव्या मजल्यावर घर आहे. त्यांचा मुलगा आणि सून पुण्यात नोकरी करतात. त्यामुळे त्या आपल्याला मुलाला भेटण्यासाठी आल्या होत्या. सकाळी त्या कपडे वाळू घालण्यासाठी गॅलरीत गेल्या होत्या. पण, कपडे वाळू घालत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या आठव्या मजल्यावरून खाली कोसळल्या.  केसरीदेवी यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.

First published:
top videos

    Tags: Accident, China, Viral, Viral videos