मराठी बातम्या /बातम्या /Viral /

इटुकली पिटुकली Baby Snowboarder! अवघ्या 11 महिन्यांच्या चिमुकलीचा सॉलिड Snow Boarding video पाहिला का?

इटुकली पिटुकली Baby Snowboarder! अवघ्या 11 महिन्यांच्या चिमुकलीचा सॉलिड Snow Boarding video पाहिला का?

चिमुकलीचं स्नोबोर्डिंग टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

चिमुकलीचं स्नोबोर्डिंग टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

चिमुकलीचं स्नोबोर्डिंग टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

  • Published by:  Priya Lad

बीजिंग, 23 नोव्हेंबर : मूर्ती लहान पण कीर्ती लहान ही म्हण आपल्याला माहितच आहे. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. अवघ्या 11 महिन्यांच्या चिमुकलीने स्नोबोर्डिंग (Baby Snowboarding video) केलं आहे (11 Month Old Baby Snow Boarder video) . काय? अकरा महिन्यांची चिमुकली कसं काय स्नो बोर्डिंग करून शकते? असंच तुम्ही म्हणाल. साहजिकच तुमचा काय कुणाचाच यावर विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.

जगात टॅलेंटेड लहान मुलांची कमी नाही. अगदी कमीत कमी वयात मुलांकडे असं कौशल्य असतं की ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. मोठी माणसंही जे करू शकत नाही, मोठ्या माणसांनाही जे अशक्य किंवा कठीण वाटतं असं ही मुलं सहजपणे करताना दिसतात. त्यापैकीच एक आहे ही अवघ्या अकरा महिन्यांची चिमुकली. वँग युजी (Wang Yuji) असं तिचं नाव.

" isDesktop="true" id="634287" >

वँग चीनच्या हेबेई प्रांतात राहते. इतक्या कमी वयात स्नोबोर्डिंग कौशल्य दाखवणारी वँग चांगलीच चर्चेत आली आहे.

हे वाचा - अवघ्या एक वर्षाचा Baby Chef शिकवतोय रेसिपी, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल So sweet

इनसाइड एडिशन युट्युब चॅनेलने वँगचा व्हिडीओ शेअर केला आहे.  व्हिडीओखाली दिलेल्या माहितीनुसार वँग युजीला एक वर्षही पूर्ण झालं नाही आणि ती ऑलिम्पिकसाठी तयार आहे.

व्हिडीओत पाहू शकता किती बिनधास्तपणे ती स्नोबोर्डिंग करते आहे. तिच्या चेहऱ्यावर भीती कुठेच दिसत नाही. उलट ती स्नोबोर्डिंगचा मनसोक्त आनंद घेताना दिसते आहे. तिच्यासोबत तिचे वडीलही दिसत आहे.

हे वाचा - बिबट्याचं कधीच पाहिलं नसेल असं रूप; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू

हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. चिमुकल्याचं कौशल्याचं कौतुक केलं जातं आहे. एका युझरने ही मुलगी ऑलिम्पिकमध्ये नक्कीच कमाल करेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

First published:

Tags: Game, Small baby, Snow, Viral, Viral videos