• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • Shocking! एका गाडीला धडकून दुसऱ्या गाडीच्या छतावर चढली चारचाकी; विचित्र अपघाताचा VIDEO

Shocking! एका गाडीला धडकून दुसऱ्या गाडीच्या छतावर चढली चारचाकी; विचित्र अपघाताचा VIDEO

व्हिडिओमध्ये दोन गाड्यांचा भयंकर अपघात पाहायला मिळतो. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण (Shocking Video) झाले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली 24 नोव्हेंबर : सोशल मीडिया (Social Media) हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. तुम्ही सर्वांनी सोशल मीडियावर अनेकदा अपघातांचे थरारक व्हिडिओ (Accident Videos Viral) पाहिले असतील. हे व्हिडिओ पाहून सगळेच हैराण होतात. सध्या असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यात दोन गाड्यांचा भयंकर अपघात पाहायला मिळतो. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण (Shocking Video) झाले आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हि़डिओ रस्त्यावरील असून गाडीत बसलेल्या या व्यक्तीने तो रेकॉर्ड केला आहे. व्हिडिओमध्ये एका गाडी समोरून येताना दिसते. इतक्यात दुसऱ्या बाजूने वेगात आणखी एक चारचाकी येते आणि दोन्ही गाड्यांची जबरदस्त धडक होते. या अपघातानंतर काही वेळातच इथे आणखी एक अजब दृश्य दिसतं. अपघातानंतर जी गाडी समोर जाऊन आदळते ती विरुद्ध बाजूने येणाऱ्या तिसऱ्या गाडीवर चढते. अपघाताचा हा विचित्र व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. तसंच या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही Protest News च्या पेजवर पाहू शकता. हा व्हिडिओ शेअर करत पेजच्या अॅडमिनने कॅप्शन दिलं, शेवटपर्यंत पाहा. आतापर्यंत हजारो लोकांनी व्हिडिओ लाईक केला असून अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. लोकांच्या प्रतिक्रियेबद्दल बोलायचं झाल्यास, एका यूजरने कमेंट करत म्हटलं, एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही पांढऱ्या कारला काहीच झालं नाही. चालकाला पुरस्कार द्यायला हवा. तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, असा व्हिडिओ याआधी कधीच पाहिला नाही. पांढरी कार अगदी सुरक्षित आहे. तिसऱ्या यूजरनं लिहिलं, मला हे जाणून घ्यायचं आहे की गाडी कोण चालवत होतं. याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: