कौतुकास्पद! 71 वर्षीय विधूर वडिलांचं मुलीने लावून दिलं लग्न; PHOTO सोशल मीडियावर व्हायरल

कौतुकास्पद! 71 वर्षीय विधूर वडिलांचं मुलीने लावून दिलं लग्न; PHOTO सोशल मीडियावर व्हायरल

एका 71 वर्षांच्या वडिलाचं, त्यांच्या मुलीने पुन्हा एकदा लग्न लावून दिलं आहे. या मुलीनेचं आपल्या वडिलांच्या दुसरा लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 एप्रिल: प्रत्येकाच्या आयुष्यात लाईफ पार्टनर अतिशय महत्त्वाचा असतो. आपल्या जोडीदाराची साथ आयुष्यभर लाभावी ही प्रत्येकाची इच्छा असते. पण सर्वांचीच ही इच्छा पूर्ण होत नाही. त्यामुळे वृद्धापकाळात दोघांपैकी कुणाला तरी एकाला एकट्यानं जगावं लागतं. अशाच एका 71 वर्षांच्या वडिलाचं, त्यांच्या मुलीने पुन्हा एकदा लग्न लावून दिलं आहे. या मुलीनेचं आपल्या वडिलांच्या दुसरा लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या मुलीने वडिलांच्या लग्नाचा फोटो शेअर करत, '5 वर्षांपर्यंत एकटं राहिल्यानंतर त्यांनी 71 व्या वर्षी पुन्हा लग्न केल्याचं', मुलीने सांगितलं आहे. या मुलीने केलेलं हे ट्विट सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झालं असून अनेकांनी तिच्या या कामाचं कौतुक केलं आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

'माझ्या 71 वर्षीय वडिलांनी पुन्हा एकदा लग्न केलं आहे. त्यांनी पुन्हा लग्न करावं अशी माझी इच्छा होती, कारण कोणीचं एकटं राहणं डिझर्व्ह करत नाही.पुनर्विवाहासाठी भारतात कायदेशीर नियम नाहीत. काही अशा स्त्रिया होत्या ज्यांनी पैसे मागितले होते. समाज त्यांना स्वीकारेल की नाही आम्हाला माहित नाही. ते दोघेही एकमेकांना किती अनुकूल आहेत, हेदेखील माहित नाही' असं ट्विट त्या मुलीने केलं आहे.

(वाचा - PPE किटमध्ये पोहोचली नवरी, कोरोनाबाधित नवरदेवाला रुग्णालयातच घातली वरमाळा)

5 वर्षांपासून एकटं राहत असलेल्या आपल्या वडिलांसाठी मुलीने उचलेलं हे पाऊल कौतुकास्पद असून, अनेकांनी तिच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: April 28, 2021, 4:45 PM IST

ताज्या बातम्या