अलाप्पुझा 26 एप्रिल: कोरोना महामारीमुळे (Coronavirus) देशभरात चिंतेच वातावरण आहे. दररोज वाढती रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकड्यांमुळे हैराण असणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर केरळमधील एका अनोख्या लग्नामुळे स्मित हास्य आलं आहे. केरळच्या एका मेडिकल कॉलेजमध्ये एक अनोखा विवाहसोहळा (Couple Tied Knots in Covid Hospital) पार पडला आहे. या लग्नात पीपीई किट (PPE Kit) घालून डॉक्टर आणि उपस्थित सर्व वराती बनले तर मेडिकल कॉलेजचा परिसर लग्नाचा मंडप.
काय आहे प्रकरण - केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यात राहाणाऱ्या एका तरुणाचं आणि तरुणीचं लग्न ठरलं होतं. मात्र, लग्नाच्या काही दिवस आधीच नवरदेवाला कोरोनाची लागण झाली. यानंतर नवरदेवाला अलाप्पुझा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. ठरलेल्या वेळेवरच हे लग्न पार पडावं यासाठी नवरीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे लग्नासाठी परवानगी मागितली. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील मेडिकल कॉलेजमध्येच दोघांच्या विवाहास परवानगी दिली.
Kerala: A couple tied knots at Alappuzha medical college and hospital today, with the bride wearing a PPE kit as the bridegroom is #COVID19 positive. The wedding took place at the hospital with the permission of the District Collector. pic.twitter.com/2IdsRDvcHZ
— ANI (@ANI) April 25, 2021
कोरोनाची काळजी करू नका, रुग्णांनीही मतदान करा; ममता बॅनर्जींचं आवाहन
लग्न ठरलेल्या दिवशीच करायचं ही नवरीची इच्छा आता पूर्ण होणार होती. त्यामुळे, रविवारी ही नवरीबाई पीपीई किट घालून रुग्णालयात पोहोचली. रुग्णालयातच पीपीई किट घातलेला स्टाफ या लग्नाचा साक्षीदार बनला. यानंतर पीपीई कीटमधील नवरीबाई आणि कोरोनाबाधित नवरदेवानं एकमेकांना वरमाळा घातली आणि पारंपारिक पद्धतीनं हा विवाहसोहळा पार पडला. कोरोना संकटाच्या काळात काही दिलासादायक बातम्याची समोर येत आहेत. ज्यामुळे चिंतेत असणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य खुलत आहे, ही बातमीदेखील अशीच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Marriage, Wedding