नवी दिल्ली 09 ऑक्टोबर : असं म्हटलं जातं, की माणूस आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकतो. यावेळी तो योग्य आणि चुकीचं यातील फरकही विसरून जातो. माणसासाठी पैसा जितका गरजेचा आहे, तितकंच तो कमवणं अवघड आहे. सध्या अमेरिकेतील (America) एक वृद्ध महिला (Elderly Woman) चर्चेचा विषय ठरत आहे. पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी तिनं असं काम सुरू केलं, की वर्षभरातच करोडपती बनली. मात्र, अनेक लोक आता तिला वेगळ्या नजरेनं पाहतात.
बाथरूममध्ये नवरा काढत होता विचित्र विचित्र आवाज; दरवाजा उघडताच हादरली बायको
69 वर्षीय मिशेल अमेरिकेच्या न्यू ओर्लियन्स येथे राहतात. त्यांचा मुलगा अपंग (Disabled Son) असून आपल्या मुलासाठीच त्यांना पैसे जमा करायचे होते. मिशेल स्वतःही हृदयरोगाच्या रुग्ण (Heart Patient) आहेत. आपण न राहिल्यास आपला मुलगा कसं आयुष्य जगेल, अशी चिंता त्यांना सतत होती. त्याची स्थिती पाहून त्यांना मुलावर उपचार करायचे होते, पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. यामुळे अॅडल्ट साईट (Adult Site) ऑन्लीफॅन्सवर (Only Fans) आपलं अकाऊंट बनवण्याचा विचार त्यांच्या मनात आला. 2020 मध्ये या साईटवर त्यांनी आपलं अकाऊंट सुरू केलं आणि वर्षभरातच त्या करोडपती झाल्या.
वर्षभरात त्यांनी तब्बल 1.5 कोटी रुपयांची कमाई केली. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, आता त्यांनी इतके पैसे कमावले आहेत, की स्वतःसाठी एक कारही खरेदी केली आहे. आता त्या आपल्या मुलासाठी पैसे जमा करत आहेत. व्हिडिओ बनवण्यासाठी त्या आपल्या व्हिडिओमध्ये (Adult Videos) तरुणांना कास्ट करतात. त्यांचं असं म्हणणं आहे, की लोकांना तरुण आणि वृद्ध महिलेची जोडी पाहायला अधिक आवडतं. या प्लॅटफॉर्ममुळे त्यांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल झाले आहेत.
'कोरोना लस घेणार त्याला मी फ्रीमध्ये...', पॉर्नस्टारने दिली खळबळजनक ऑफर
या वयात आपण काहीच काम करू शकत नाही, असं त्यांना वाटत असे. मात्र, आता लोक या कामामुळे त्यांना ट्रोलही करतात. यावर बोलताना त्यांनी म्हटलं, लोकांना असं वाटतं की महिलांची लैंगिक इच्छा कमी वयापर्यंतच राहाते आणि वृद्ध होऊ लागताच संपून जाते. मात्र, असं नाही. त्यांनी म्हटलं, की लोकांना वृद्ध माणसांना केवळ असहाय्य पाहावं वाटतं. मिशेल यांचे व्हिडिओ भरपूर लोकप्रिय होतात आणि त्यांना या गोष्टीचं अजिबातबही वाईट वाटत नाही, की त्या या माध्यमातून पैसे कमवत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Porn sites, Porn star