जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लग्नानंतर 4 महिन्यातच तरुण पतीकडे महिलेनं केली बाळाची मागणी; वयाच्या 61व्या वर्षी व्हायचय आई

लग्नानंतर 4 महिन्यातच तरुण पतीकडे महिलेनं केली बाळाची मागणी; वयाच्या 61व्या वर्षी व्हायचय आई

लग्नानंतर 4 महिन्यातच तरुण पतीकडे महिलेनं केली बाळाची मागणी; वयाच्या 61व्या वर्षी व्हायचय आई

वयातील अंतराकडे दुर्लक्ष करून लग्नबंधनात अडकलेली ही जोडी आता आई-वडील बनण्याच्या तयारीत आहे (Baby Planning). दोघांच्या वयामध्ये 37 वर्षाचं अंतर आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 17 जानेवारी : प्रेम (Love) आंधळं असतं, असं तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल. प्रेमात पडल्यावर अनेकदा जोडप्याला चुकीचं आणि बरोबर यातला फरक कळणंही बंद होऊन जातं. आता तर वयातील अंतरही लोकांना प्रेमात पडण्यापासून रोखू शकत नाही. अशाच प्रेमामुळे 24 वर्षीय कुरान मॅककेन याने 61 वर्षाच्या चेरिल मॅकग्रेगोर हिच्यासोबत लग्नगाठ बांधली (Young Man Married with 61 Years old Woman). मागील वर्षीच एकमेकांना डेट केल्यानंतर दोघंही विवाहबंधनात अडकले. मात्र, आता हे कपल वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

गर्लफ्रेंडच्या ‘त्या’ व्हिडीओने बॉयफ्रेंडला झटका, सोशल मीडियावरही चर्चा

वयातील अंतराकडे दुर्लक्ष करून लग्नबंधनात अडकलेली ही जोडी आता आई-वडील बनण्याच्या तयारीत आहे (Baby Planning). दोघांच्या वयामध्ये 37 वर्षाचं अंतर आहे. मात्र, तरीही दोघांनी मागील वर्षी लग्नगाठ बांधली. आता कुरानने सांगितलं, की त्याला आणि त्याच्या पत्नीला लवकरच आई-वडील होण्याची इच्छा आहे. दोघांचं हे पहिलं बाळ असेल. रोमच्या जॉर्जियामध्ये राहणाऱ्या या कपलची पहिली भेट तेव्हा झाली, जेव्हा कुरान अवघ्या पंधरा वर्षाचा होता. त्यावेळी दोघंही एका फूड चेनमध्ये भेटले होते. कुरान चेरिल यांच्या मुलाच्या दुकानात काम करत असे. तेव्हापासून ते दोघंही एकमेकांच्या जवळ आले आणि मागील वर्षी दोघांनी लग्नगाठ बांधली. दोघांच्या म्हणण्यानुसार, आता ती योग्य वेळ आली आहे, जेव्हा ते कुटुंब सुरू करण्याबाबत विचार करू शकतात. चेरिल यांना आधीपासूनच 7 मुलं आणि 17 नाती-नातू आहेत. मात्र, यानंतरही त्यांना आता मुल हवं आहे. वयाच्या या टप्प्यात आई कसं बनायचं, यासाठी ते डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत आहेत. रोमान्ससाठी प्रियकराला दिली दुसरीच तरुणी; रिलेशनमध्ये आला भलताच ट्विस्ट कुरानने सांगितलं की मागील वर्षी 7 सप्टेंबरला त्यांनी लग्नगाठ बांधली. आता त्यांना असं वाटत आहे, की कुटुंब सुरू करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. चेरिलची अनेक मुलं आहेत, मात्र आता तिला आमचं मुल हवं आहे. दोघांनी यासाठी प्रयत्न केले, मात्र चेरिलच्या वयामुळे हे शक्य झालं नाही. आता ते सरोगसी किंवा मुलं दत्तक घेण्याची तयारी करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात