नवी दिल्ली 27 सप्टेंबर : आजकाल लहान मुलंदेखील सर्रास मोबाईलचा वापर (Children's use Mobile Phones) करताना दिसतात. मात्र, हे किती घातक ठरू शकतं, याचा अंदाजच बहुतेकदा पालकांना येत नाही. नुकतंच इंग्लंडमध्ये राहणाऱ्या 6 वर्षाच्या एका मुलीनं मोबाईलवर TikTok Challenge पूर्ण करण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकल्याचं समोर आलं आहे. ही घटना अशा व्यक्तींसाठी एक मोठं उदाहरण आहे, जे लहान मुलांना मोबाईल दिल्यानंतर आपली मुलं यात नेमकं काय पाहात आहेत, याकडे लक्षही देत नाहीत.
VIDEO: गर्दीच्या ठिकाणी Bikini घालून पोल डान्स करू लागला तरुण; बघत राहिले लोक
The Sun नं दिलेल्या वृत्तानुसार, East Sussex मध्ये राहणाऱ्या सहा वर्षाच्या मुलीनं तब्बल 23 लोहचुंबक गिळले (Girl Swallows 23 Magnets) . जेव्हा तिच्या पोटात दुखू लागलं आणि वारंवार तिल्या उलट्या होऊ लागल्या तेव्हा पालक तिला रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी लगेचच तिचं ऑपरेशन केलं. मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहून या मुलीनं लोहचुंबक गिळले होते.
इंग्लंडच्या या सहा वर्षीय मुलीनं मोबाईलवर व्हिडिओ पाहताना TikTok Challenge पूर्ण करण्यासाठी लोहचुंबक गिळले होते. डॉक्टरांनी तिच्या पोटाची सर्जरी करून हे मॅगनेट बाहेर काढले. मॅगनेटमुळे तिच्या आतड्यांना बरंच नुकसान पोहोचलं होतं. जेव्हा आई वडिलांना आपल्या मुलीनं लोहचुंबक गिळले आहेत हे माहिती झालं तेव्हा त्यांनी तिच्या रूममध्ये झडती घेतली. इथे लोहचुंबक आढळले. वेळीच ही बाब लक्षात आल्यानं मुलीचा जीव वाचला, अन्यथा यात तिचा मृत्यू होण्याची शक्यता होती.
अभिनेत्रीचा विचित्र रेकॉर्ड; एका दिवसात 300 पुरुषांसोबत शारिरीक संबंध, वर म्हणते
या मुलीचं ऑपरेशन करणारे पीडियाट्रिक सर्जन कोस्टा हीली यांनी सांगितलं, की मॅगनेटमुळे या मुलीच्या आतड्यांना जखम झाली होती. तिला वेळेत रुग्णालयात आणलं नसतं तर परिस्थिती बिघडली असती. त्यांनी पालकांना सल्ला दिला, की लहान मुलांच्या आसपास ते गिळतील अशा काही वस्तू असल्यास त्या त्यांच्या नजरेपासून दूर ठेवाव्या. मॅगनेट शरीरासाठी घातक ठरू शकतं. मुलीच्या पलाकांनीही इतर पालकांना सल्ला दिला आहे, की आपली लहान मुलं मोबाईलचा नेमका काय वापर करत आहेत याकडे लक्ष द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Tiktok