• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO: हे काय! गर्दीच्या ठिकाणी Bikini घालून पोल डान्स करू लागला तरुण; अवाक होऊन बघत राहिले लोक

VIDEO: हे काय! गर्दीच्या ठिकाणी Bikini घालून पोल डान्स करू लागला तरुण; अवाक होऊन बघत राहिले लोक

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की आसपास असणाऱ्या महिला या व्यक्तीकडे अवाक होऊन पाहात आहेत. या व्यक्तीचं अजब कृत्य सर्वांचंच लक्ष वेधत आहे

 • Share this:
  नवी दिल्ली 27 सप्टेंबर : इंटरनेटवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करतात. अनेकजण आपले निरनिराळे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर (Social Media) अपलोड करत असतात. यातील काही व्हिडिओ असे असतात जे पाहून हसू आवरत नाही. तर काही व्हिडिओ असे असतात जे पाहताच डोळ्यांत पाणी येतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Weird Video Viral on Social Media) होत आहे. यात एक व्यक्ती बिकनी घालून पोल डान्स (Pole Dance in Bikini) करताना दिसत आहे. या व्यक्तीचा हा विचित्र डान्स पाहून लोकांना हसू आवरत नाहीये. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. 'सेकंड हँड जवानी' गाण्यावर मंदिरात तरुणीचा धुमाकूळ; Video आल्यानंतर परिसरात खळबळ व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की गर्दीच्या ठिकाणी एक व्यक्ती बिकनी घालून पोल डान्स करत आहे. या व्यक्तीला पाहून असं वाटतं, की याला या गोष्टीची अजिबातही चिंता नाही, की लोक त्याच्याबद्दल काय विचार करतील. हा व्यक्ती आपल्याच नादात मग्न होऊन डान्स करत आहे.
  व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की आसपास असणाऱ्या महिला या व्यक्तीकडे अवाक होऊन पाहात आहेत. या व्यक्तीचं अजब कृत्य सर्वांचंच लक्ष वेधत आहे. काही लोक या व्यक्तीचा व्हिडिओ बनवतानाही दिसतात. हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर official_viralclips नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. 'तिला' पाहताच मंडपातून पळत सुटली नवरी; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरनं यावर कमेंट करत लिहिलं, की लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी या जगात लोक काहीही करू शकतात. इतरही अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 1000 हून अधिकांनी लाईक केला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: