मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Shocking! आधी रस्त्यावर एकत्र आल्या 50 एअर होस्टेस; मग काढू लागल्या कपडे अन्...

Shocking! आधी रस्त्यावर एकत्र आल्या 50 एअर होस्टेस; मग काढू लागल्या कपडे अन्...

या एअर होस्टेस इटलीच्या नव्या राष्ट्रीय एअरलाईन्स कंपनीत काम करतात. त्यांनी कंपनीच्या विरोधात प्रदर्शन करण्यासाठी ही अजब पद्धत वापरली

या एअर होस्टेस इटलीच्या नव्या राष्ट्रीय एअरलाईन्स कंपनीत काम करतात. त्यांनी कंपनीच्या विरोधात प्रदर्शन करण्यासाठी ही अजब पद्धत वापरली

या एअर होस्टेस इटलीच्या नव्या राष्ट्रीय एअरलाईन्स कंपनीत काम करतात. त्यांनी कंपनीच्या विरोधात प्रदर्शन करण्यासाठी ही अजब पद्धत वापरली

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 26 ऑक्टोबर : आजपर्यंत अनेकदा तुम्ही एअर हॉस्टेला त्यांच्या यूनिफॉर्ममध्ये तुम्हाला प्रवासातील नियम आणि कायदे सांगताना पाहिलं असेल. मात्र, इटलीच्या (Italy) रोममधील लोक तेव्हा हैराण झाले जेव्हा त्यांनी भरचौकात एअर होस्टेसला कपडे काढताना पाहिलं. जवळपास ५० एअर होस्टेसचा एक ग्रुप तिथे आला आणि त्यांनी अगदी शांतीत एक एक करून आपले कपडे काढून खाली ठेवण्यास सुरुवात केली (50 Air Hostesses Stripped off Uniforms).

'इथे येताना स्कर्ट घालू नका'; महिला पर्यटकांना दिला जातोय अजब सल्ला, वाचा कारण

या एअर होस्टेस इटलीच्या नव्या राष्ट्रीय एअरलाईन्स कंपनीत काम करतात. त्यांनी कंपनीच्या विरोधात प्रदर्शन करण्यासाठी ही अजब पद्धत वापरली. ITA Airways मध्ये झालेल्या पगार कपातीविरोधात त्यांचं हे प्रदर्शन होतं. सरकारविरोधातील आपला राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी रस्त्यातच आपला युनिफॉर्म काढायला सुरुवात केली.

या एअर होस्टेसचं असं म्हणणं आहे, की ITA Airways त्यांच्या मेहनतीमुळे आज यशाच्या शिखरावर आहे, मात्र तरीही कंपनी त्यांच्यासोबत अन्याय करत आहे. याच आठवड्यात एका फ्लाईट अटेन्डेंटला नोकरीवरुन काढण्यात आल्यानंतर या एअर होस्टेसनं विरोध प्रदर्शन कऱण्याचा निर्णय घेतला. आपला राग व्यक्त करण्यासाठी या सर्व आपल्या युनिफॉर्ममध्ये एका चौकात जमा झाल्या. यानंतर तिथेच आपली कपडे काढून केवळ अंतर्वस्त्रावर त्यांनी प्रदर्शन कऱण्यास सुरुवात केली. या सर्व आधी Alitalia Airlines मध्ये काम करत असे, आता त्यांनी नवीन एअरलाइन्स ITA Airways मध्ये हायर केलं गेलं आहे. मात्र, त्यांच्या वेतनात घट करण्यात आली आहे. अनेकांचं प्रमोशनही यामुळे होऊ शकलेलं नाही.

'2 मुलांसोबत एकाच सोफ्यावर झोपावं लागतं'; कपलनं थेट प्रशासनाकडे मागितली मदत

एअर होस्टेसनं शांततेत आपला युनिफॉर्म काढला आणि ‘हम सब Alitalia हैं’ अशा घोषणा त्या देऊ लागल्या. Alitalia त्या कर्मचाऱ्यांना नवीन एअरलाईन्स बनल्यापासून दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे, असा या एअर होस्टेसचा आरोप आहे. आधी एअरलाईन्सअंतर्गत ११० विमानं चालवली जात होती. यासाठी १० हजार लोकांची टीम काम करत होती. मात्र आता नवीन ITA Airways अंतर्गत केवळ ५२ एअरक्राफ्ट सुरू असून यात केवळ 2800 लोकांची गरज आहे. अशात अनेकांची नोकरी गेली आहे तर काहींनी कमी पगारात काम दिलं जात आहे.

First published:

Tags: Viral news