वाघ कुत्र्याच्या जवळ जातो आणि वास घेऊ लागतो. यानंतर तो कुत्र्याला स्पर्श करू लागतो. हे पाहून कुत्रा थोडा घाबरल्यासारखा दिसतो. दोन वाघ वरती दगडावरही बसलेले दिसतात. याचदरम्यान एक पांढरा वाघ तिथे येतो. तो कुत्र्याच्या जवळ जाऊन थांबतो आणि कुत्र्याचा वास घेण्याचा प्रयत्न करतो. इतक्यात आणखी दोन वाघ तिथे येतात. आता कुत्रा पाच वाघांच्या मध्ये अडकतो. मात्र, यापुढे नेमकं काय घडलं हे माहिती नाही. कुत्र्यासोबत अखेर काय झालं, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. VIDEO: वहिनीच्या उत्तरावर दिराची विचित्र रिअॅक्शन ; ऐकताच भावजयीनं लगावली चापट या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीनं लिहिलं, हे पाहून मला खरंच भीती वाटत आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की कदाचित हा कुत्रा या वाघांसोबतच मोठा झाला आहे. त्यामुळे त्याला त्यांच्यासोबत सुरक्षित वाटत असावं. इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ yournaturegram नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ २० लाखाहून अधिकांनी पाहिला आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Tiger attack