Home /News /viral /

कारसोबत रेस लावणाऱ्या तरुणाचा 'टांगा पलटी घोडे फरार'; बाईकसह हवेत उडाला अन्..., पाहा Shocking Video

कारसोबत रेस लावणाऱ्या तरुणाचा 'टांगा पलटी घोडे फरार'; बाईकसह हवेत उडाला अन्..., पाहा Shocking Video

सध्या सोशल मीडियावर एका भयानक बाईक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल (Shocking Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

    नवी दिल्ली 13 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) जर तुम्ही सक्रीय असाल तर एकापेक्षा एक स्टंट व्हिडिओ (Stunt Video) आतापर्यंत तुम्ही पाहिले असतील. सध्या तरुणांमध्ये स्टंट करण्याची क्रेझ प्रचंड वाढली आहे. अनेकदा काही लोक असे स्टंट करतात, जे पाहून अंगावर काटा येतो. बहुतेकदा बाईकर्स असे स्टंट (Stunt of Bikers) करून लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, अनेकदा त्यांचा हाच स्टंट घातकही ठरतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका भयानक बाईक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल (Shocking Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. गार्डनमधील जुन्या मूर्तीनं पालटलं वृद्ध दाम्पत्याचं नशीब; रातोरात बनले करोडपती काही लोक आपल्या व्हिडिओवर आणि फोटोवर लाईक्स मिळवण्यासाठी स्वतःचा जीवही धोक्यात टाकतात. विशेषतः स्टंट व्हिडिओ पाहताना हे प्रकर्षाने जाणवतं. ट्विटरवर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती रस्त्यावर कारसोबत रेस लावण्याचा प्रयत्न करतो. मात्र, पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत असं काही घडतं, ज्याचा विचारही त्यानं केला नसेल. बाईकर स्टंट करत रेस लावण्याचा प्रयत्न करतो. इतक्यात बॅलन्स बिघडतो आणि तो थेट तोंडावर आपटतो. व्हिडिओ पाहूनच तुम्ही अंदाज लावू शकता की यात बाईकरला किती मार लागला असेल. बॅलन्स बिघडल्यानं हा बाईकर काही अंतर घसरत पुढे जातो. तर, त्याची भरधाव दुचाकी रस्त्यावर पडते आणि तिचे अनेक पार्ट तुटून पडतात. हा व्हिडिओ पाहून अनेक यूजर्स हैराण आहेत. आधी पेट्रोल भरलं, नंतर कर्मचाऱ्यालाही गाडीत कोंबलं; अपहरणाचा LIVE VIDEO हा व्हिडिओ @FINALLEVEL नावाच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत १ लाख ७१ हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर, शेकडो लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, १५ वर्षाचा असतानापासून बाईक चालवतोय, पण आतापर्यंत असलं मुर्खपणाचं काम कधी केलं नाही. दुसऱ्या एकानं आश्चर्य व्यक्त करत विचारलं, की इतक्या जोरात पडल्यानंतरही हा बाईकर चालू कसा लागला. इतरही अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking video viral, Stunt video

    पुढील बातम्या