जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO: वहिनीनं दिलेल्या बॅड न्यूजवर दिराची विचित्र रिअ‍ॅक्शन ; ऐकताच भावजयीनं लगावली जोरदार चापट

VIDEO: वहिनीनं दिलेल्या बॅड न्यूजवर दिराची विचित्र रिअ‍ॅक्शन ; ऐकताच भावजयीनं लगावली जोरदार चापट

VIDEO: वहिनीनं दिलेल्या बॅड न्यूजवर दिराची विचित्र रिअ‍ॅक्शन ; ऐकताच भावजयीनं लगावली जोरदार चापट

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की वहिनी अचानक आपल्या दिराजवळ येते. दुःखी होऊन ती आपल्या दिराला एक बॅड न्यूज (Bad News) सांगते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 13 ऑक्टोबर : घरात दीर आणि वहिनीची नेहमीच जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळते. वहिनी आपल्या दिराला भावाप्रमाणे आणि मुलाप्रमाणे मानते. हे नातं मित्र-मैत्रिणीप्रमाणेही असतं. सोशल मीडियावरही (Social Media) सध्या अशाच एका दिराचा आणि वहिनीचा व्हिडिओ व्हायरल (Funny Video Viral) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. आधी पेट्रोल भरलं, नंतर कर्मचाऱ्यालाही गाडीत कोंबलं; अपहरणाचा LIVE VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की वहिनी अचानक आपल्या दिराजवळ येते. दुःखी होऊन ती आपल्या दिराला एक बॅड न्यूज (Bad News) सांगते. ही बातमी ऐकताच दीर स्वतःदेखील हैराण होतो. वहिनी इथे येऊन आपल्या दिराला म्हणते, की तुला माहितीये का? रामलालच्या मुलाचा मृत्यू झाला. यावर दीर तिला प्रश्न विचारतो, की कसं काय? वहिनी उत्तर देत त्याला सांगते, की त्याच्यावरुन कार गेली. हे ऐकून दीर हैराण होतो आणि तो जे काही उत्तर देतो, ते ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

जाहिरात

दीर आपल्या वहिनीला आपल्यासोबतही घडलेली अशीच एक घटना सांगतो. दीर हैराण होईन आपल्या वहिनीला म्हणतो, की माझ्यावरुन तर विमान गेलं, तरीही मला काहीच झालं नाही. दिराचं हे विचित्र उत्तर ऐकून वहिनीला राग अनावर होतो आणि तो रागात त्याला जोराने चापट मारते. लॉटरी जिंकण्याआधीच व्यक्तीनं केला भयंकर खुलासा, आता पोलीस घेतायेत शोध हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलातच व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर देवर अॅण्ड भाभी नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ अनेकांनी लाईक केला आहे. तर, अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात