
जुहू बीच
जुहू बीचवर तुम्ही केव्हा ही जा, तो तुम्हाला नेहमी लोकांनी भरलेलाच दिसेल. पण व्हॅलेंटाईन डेला तर हे ठिकाण अक्षरशः प्रेमींच्या गर्दीनं भरुन जातो. जर तुम्हाला तुमचा स्पेशल दिवस हजारो-लाखो लोकांसोबत शेअर करायचा नसेल आणि तुम्हाला शांतता हवी असेल तर या ठिकाणी कधीही जाऊ नका.

मरीन ड्राइव्ह
मुंबईच्या सर्वात भव्य खुणांपैकी एक, मरीन ड्राईव्ह ज्याला क्विन नेकलेस सुद्धा म्हणतात. इथे जाणे फारच रोमांटिक मानले जाते. पण येथील वातावरण किंवा परिसर अजिबात शांत नाही. कारण या ठिकाणी तुम्हाला अनेक जोडपी बसलेली तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे जर तुम्ही विचार करत असाल की निळ्या आकाशाखाली तुम्हाला तुमच्या जोडीदारासह चमचमणाऱ्या चांदण्यांचा आनंद घेता येईल. तर असं होणार नाही. उलटं लोकांची गर्दी पाहून तुमचं डोकं उठेल.

बँडस्टँड
आता तुम्हाला कदाचित शाहरुख खानच्या घरासमोर तुमचे प्रेम व्यक्त करताना बॉलीवूडचा क्षण आठवेल, तसेच हे तुम्हाला रोमांटिक देखील वाटेल. असा विचार असंख्य जोडप्यांनी केला असावा. तसेच तेथे प्रेमी जोडपी असंख्य दिसतील, त्यामुळे हा तुमचा प्लान फ्लॉप आहे. कॉफी शॉप्सपासून ते वांद्रे किल्ल्यापर्यंत बँडस्टँडवर लाखो लोकांचा थवा असेल.

कार्टर रोड
कार्टर रोडवरून सूर्यास्त पाहणे खूप रोमँटिक असू शकते. पण इथे जाण्याचा विचार करत असाल तर हा प्लान देखील फ्लॉप ठरेल. कारण या भागात इतकी गर्दी असेल की तुम्हाला सुर्यास्त पाहण्याचा आनंद घेता येणार नाही. इथे लोकांचा इतका आवाज आणि गोंधळ असेल की तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत एकांत मिळणार नाही.

वांद्रा रेक्लेमेशन
वांद्रा रेक्लेमेशनच्या रोडवर प्रेमी जोडप्यांची बाईकवर रांग लागलेली असते. इथे सार्वजनिकपणे अनेक जोडपी आपले खासगी क्षण घालवत असतात. पण इथे देखील इतकी गर्दी असेल की, तो एकांत तुम्हाला मिळणारच नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.