न्यूयॉर्क, 11 मे : जगभरातील सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळं काही लोकं घरापासून दूर अडकले आहेत. त्यामुळं महिनाभर कुटुंबातील सदस्यांना पाहताही येत नाही आहे. असेच एक बाबा तब्बल 50 दिवसांनी आपल्या 4 वर्षांच्या चिमुरडीला भेटले. मिला सनेड आपल्या वडिलांना तब्बल 7 आठवडे म्हणजे 50 दिवसांनी भेटली. मिलाला कर्करोग असल्यामुळं सध्या तिची केमोथेरपी सुरू आहे. त्यामुळं तिची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळं तिला कोरोनाची लागण होईल या भीतीनं तिचे बाबा तिच्यापासून लांब राहिले. मात्र तब्बल 50 दिवसांनी बाबा दिसल्यानंतर मिलानं त्यांना कडकडून मिठी मारली आणि दोघेही रडू लागले. हा व्हिडीओ रेक्स चॅपमननं ट्वीटरवर शेअर केला.
हेही वाचा- रस्त्यावर चालता चालता गर्भवती महिलेनं दिला बाळाला जन्म, VIDEO VIRAL 26 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये बाप-लेकीच्या प्रेमाचे दर्शन घडते. आयटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार वडील स्कॉट आपल्या मुलीला कोरोनाची लागण होईल या भीतीनं तिला भेटले नव्हते. त्यांनी मिलाला स्वतंत्र खोलीत ठेवले होते. केवळ तिची आई तिच्यासोबत होती. स्कॉट केवळ मिलाला खिडकीतून पाहायचे. अखेर 50 दिवसांनी या दोघांची भेट झाली. हेही वाचा- VIDEO : लॉकडाऊनच्या नियमाला हरताळ, सायकलवरून विनामास्क फिरतायत भाजपचे खासदार हेही वाचा- …आणि अचानक समोर आला हत्ती, पुढे काय घडलं पाहा श्वास रोखून ठेवणारा VIDEO