जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रस्त्यावर चालता चालता गर्भवती महिलेनं दिला बाळाला जन्म, VIDEO VIRAL

रस्त्यावर चालता चालता गर्भवती महिलेनं दिला बाळाला जन्म, VIDEO VIRAL

रस्त्यावर चालता चालता गर्भवती महिलेनं दिला बाळाला जन्म, VIDEO VIRAL

‘आपण आपल्या मुलाला वाचवू नाही शकणार असं एक क्षण मनात आलं आणि काळजात धस्स झालं असं चेन सांगत होत्या.’

  • -MIN READ
  • Last Updated :

बिजिंग, 11 मे : जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. चीनच्या वुहानमधून हा व्हायरस पसरण्यास सुरुवात झाली होती. आता चीनमध्ये ह्या व्हायरसवर नियंत्रण मिळवल्याचं सांगितलं जात आहे. यातच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. गर्भवती महिला बाजारातून घरी परतत असताना तिची भररस्त्यात प्रसूती झाली. एका गोंडस बाळाला या महिलेनं जन्म दिलं. हा संपूर्ण प्रकार रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकारानंतर घटनास्थळी स्थानिकांनी खूप गोंधळ केला होता. काही जणांनी या महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी मदतही केली. डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार या महिलेची पहिल्यांदाच प्रसूती होत होती आणि घटनेदरम्यान फक्त तिच्यासोबत वृद्ध व्यक्ती उपस्थित होते. महिलेची प्रसूती होताच ती रस्त्यात रडायला लागली. काही लोक या व्हिडीओमध्ये त्या महिलेला मदत करतानाही दिसतात. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला प्रसूती कळा येत असल्यानं रुग्णवाहिकेची वाट पाहात उभी होती. मात्र रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकली नाही महिलेनं 10 वाहनधारकांकडे मदत मागितली होती मात्र त्यांनी मदत करण्यास नकार दिला.

चीनच्या स्थानिक मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार ही घटना 4 मे रोजी घडली होती. महिलेचं नाव चेन असल्याचं सांगितलं जात आहे. या महिलेनं रस्त्यातच मुलाला जन्म दिला. आपण आपल्या मुलाला वाचवू नाही शकणार असं एक क्षण मनात आलं आणि काळजात धस्स झालं असं चेन सांगत होत्या. पण सुदैवानं दोघांचीही प्रकृती सुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हे वाचा- शिकारीच्या शोधात आलेल्या बिबट्याला कुत्र्यांनं शिकवला धडा, पाहा VIDEO हे वाचा- नको ते धाडस पडलं महागात! सिंहासोबत सेल्फी घेणं तरुणाला चांगलंच भोवलं, पाहा VIDEO संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात