करनाल, 11 मे : हरियाणामधील करनाल लोकसभेचे खासदार संजय भाटिया यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी मास्क न लावता सायकलिंग केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावण्याचं आणि लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात असताना मात्र त्याचं उल्लंघन चक्क खासदारांनी केलं आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये भाजपा खासदार संजय भाटिया लॉकडाऊनमध्ये मास्क न घालता सायकलवरून जाताना दिसत आहेत. मास्क घातल्याशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, असा आदेश हरियाणा सरकारने दिले आहेत. शासनाच्या नियमांचं उल्लंघनच लोकप्रतिनिधी करताना दिसत आहेत तर सामान्य नागरिकांचं काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
व्हिडिओचे सत्य जाणून घेण्यासाठी करनाल लोकसभेचे खासदार संजय भाटिया यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. न्यूज 18 हरियाणाच्या या पत्रकाराने खासदार खासदाराशी बोलताना ते म्हणाले की, खासदार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये व्यस्त आहेत असं सांगून त्यांनी बोलणं टाळलं आहे. कोरोनाचे गुडगाव इथे 28 नवीन रुग्ण समोर आले आहेत. आतापर्यंत 142 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर इथे भाजी मार्कमधील विक्रेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. वारंवार प्रशासनाकडून आवाहन करूनही लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन होत आहे. संपादन- क्रांती कानेटकर