थडगाम, 10 मे : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात काही मजेशीर असतात तर काही शिकवणारे तर काही अनुभव शेअर करणारे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वन्य प्राण्यांसोबत डील करणं किंवा रहाणं एवढं सोपं नाही. अनेकदा ते आपल्याला कळत नकळत बऱ्याच गोष्टी शिकवत असतात. वन्य प्राण्यांच्या वाटेत अडवं आल्यानंतर किंवा त्यांना राग अनावर झाल्यावर काय घडतं याची नुसती कल्पनाच केलेली बरी.
तमिळनाडू इथे थडगाम भागातला एक व्हि़डीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता. एका जीपमधून काही लोक जात आहे आणि अचानक समोरून भलामोठा हत्ती येतो. हा हत्ती रागात आहे हे पाहून आरडाओरडा सुरू केला जातो. त्यामुळे हत्ती आणखीन चिडतो आणि जीपवर हल्ला करण्यासाठी पुढे जातो. हत्तीचा राग पाहून जीप चालक घाबरून जीप मागे घेतो. तरीही हत्ती काही ऐकत नाही. या लोकांना हत्ती आपला हिसका दाखवतो.
Forest life is not all beauty. Beast can teach you life lessons many times🙏 It happened near Thadagam area Tamil Nadu. That’s the TN forest department jeep. Lucky👌 pic.twitter.com/DVmrQEbsgY
— Susanta Nanda IFS (@susantananda3) May 10, 2020
हे वाचा-VIDEO : लॉकडाऊनमध्ये खाण्याच्या शोधा घरी आला जंगली पाहुणा छतावर चढला आणि...
हत्तीचा हा अवतार पाहून जीपमधले सर्वजण जीप सोडून पळ काढतात. चिडलेला हत्ती गाडीची तोडफोड करतो. IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. 1.5 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 36 युझर्सनी हा रिट्वीट केला आहे. 'वन्य प्राण्यांसोबत राहाणं वाटतं तेवढं सोपं नाही, कधीकधी प्राणी आपल्याला धडा शिकवतात' असं कॅप्शन IFS सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना दिलं आहे. हत्तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
हे वाचा-पुणे, मुंबईत कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन तर नाही ना? ICMR करणार तपासणी
संपादन- क्रांती कानेटकर.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral video.