व्हिएतनाम, 11 फेब्रुवारी : दररोज किमान 7-8 तासांची झोप शरीरासाठी आवश्यक असल्याचं सांगितलं जातं. एक दिवस नीट झोप मिळाली नाही तर अस्वस्थ वाटतं. काही दिवस झोपलोच नाही तर आजारी असल्यासारखं वाटतं. किंबहुना आजारीच पडायला होतं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक व्यक्ती दोन-तीन किंवा 10-20दिवस नव्हे तर तब्बल गेली 60 वर्षे झोपलीच नाही. ऐन तारुण्यात त्यांच्यासोबत असं काही घडलं की त्यानंतर त्यांची झोप कायमची उडाली. व्हिएतनाममध्ये राहणारे 80 वर्षांचे थाई एनजोक, जे आपण गेली 62 वर्षे झोपलो नसल्याचा दावा करतात. 1962 सालापासून आपण झोपलोच नाही असं ते सांगतात. त्यांची पत्नी आणि मुलांनीही त्यांना 6 दशकं झोपताना पाहिलं नाही. बऱ्याच वर्षांनी ते डॉक्टरांकडे गेले. तेव्हा त्यांना इन्सोम्निया म्हणजे अनिद्रेचा आजार असल्याचं निदान झालं. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होतो. पण थाई यांच्याबाबतीत असं काहीच नाही. त्यांच्या आरोग्यावर काहीच वाईट परिणाम दिसून आला नाही. आश्चर्य म्हणजे इतरी वर्षे न झोपताही वयाच्या 80 मध्येही ते एकदम फिट आणि अॅक्टिव्ह आहेत. स्वतःची कामं स्वतः करतात. हे वाचा - BF समजून तरुणीने वडिलांनाच…; झोपेत असं काही करून बसली की झोप कायमची उडाली; VIDEO VIRAL ते सांगतात काही वेळा ड्रिंक घेतल्यानंतर थोडी सुस्ती येते पण काही वेळ ते असेच पडतात पण तरी झोप येत नाही. कित्येक वेळा पूर्ण रात्र बेडवर फक्त डोळे बंद करून राहतात पण तरी त्यांचा मेंदू सक्रिय राहतो, त्यांना झोप काही लागत नाही. त्यांच्या अनिद्रेचं नेमकं कारण माहिती नाही. पण जेव्हापासून त्यांची झोप उडाली त्याबाबत त्यांनी जे सांगितलं ते हैराण करणारं आहे. 62 वर्षांपूर्वी त्यांना ताप आला आणि त्यानंतर त्यांची झोप उडाल्याचं ते सांगतात. एनजोक म्हणआले, ते 18 वर्षांचे होते तेव्हा त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांना खूप ताप आला होता. त्यानंतर त्यांना झोपच लागत नव्हती. तब्येत ठिक नसल्याने असं होत असावं असं त्यांना वाटलं. पण काही कालावधीनंतर त्यांना आता आपल्यााल झोप येतच नाही हे दिसून आलं. हे वाचा - Dream job! फक्त खा आणि झोपा; कंपनी देणार तब्बल 81 हजार रुपये पगार प्रसिद्ध यूट्यूबर ड्रयू बिन्स्कीने एनजोक यांची मुलाखत घेतली. ज्यात त्यांनी ही आपली संपूर्ण कहाणी सांगितली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.