नवी दिल्ली, 24 जून : साध्या गाडीने धडक दिली तरी हातपाय तुटतो. अंगावरून गाडी गेली तर मृत्यू अटळ. पण काही लोक इतके नशीबवान असतात की भयानक अपघाता तूनही ते बचावतात. चमत्कारिक पद्धतीने त्यांचा जीव वाचतो. अशाच एका अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. अंगावरून 3 बाईक जाऊनही ही चिमुकली बचावली आहे. एका चिमुकलीला तीन बाईकने चिरडलं. आता यानंतर काय होईल याची कल्पनाही तुम्हाला नकोशी वाटेल. तुमच्या काळजात धस्सं झालं असेल. पण या प्रकरणात तसं काहीच झालं नाही. उलट सर्वांना धक्का बसला पण तो इतक्या भयानक अपघाततही चिमुकली जिवंत राहिली म्हणून. सर्वांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक रस्त्यावर गाड्या ये-जा करत आहेत. वाहनांची वर्दळ असलेल्या याच रस्त्यावर एक चिमुकली एकटीच धावत येते. रस्त्या ओलांडण्याचा प्रयत्न ती करत असते. रस्त्याच्या मधोमध येताच एक भरधाव बाईक येते आणि चिमुकलीला उडवून जाते. तशी ती रस्त्यावर पडते. इतक्यात मागून दुसरी बाईक येते ती तिच्या अंगावरून जाते. पुन्हा तिसरी बाईक येते तीसुद्धा तिला चिरडून जाते. Titan submarine : ज्या पाणबुडीत गेला 5 अब्जाधीशांचा जीव; इतकं कोटी होतं त्याचं तिकीट हे दृश्य पाहताच आपल्या काळजाचं पाणी पाणी होतं. पण पुढे जे दिसलं ते पाहून विश्वासच बसत नाही. चिमुकलीला काहीच झालेलं नाही. एक महिला तिच्याकडे धावत येते. कदाचित ती तिची आई असावी. ती तिला उचलून घेते. तिला कुठे लागलं आहे का बघते. चिमुकली घाबरली आहे ती खूप रडते. पण तिला काही झालेलं दिसत नाही. तिला कोणतीच दुखापच झालेली नाही. ही संपूर्ण घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. जर हे रेकॉर्ड झालं नसतं तर कदाचित यावर विश्वासच बसला नसता. Nandurbar : कारमध्ये बसला अन् एक्सलेटरवर पाय ठेवला, शोरुमध्येच कार सुसाट, एकाचा जागीच मृत्यू, LIVE VIDEO @Mystik_33 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे.
The lorry would have run over that child were it not for the accident caused by the motorcycle. The motorcycle was just a sabab (cause/reason) to technically ‘save’ her life.
— 𝐊𝐇Δ𝐋𝐈𝐋𓂀𓅓 (@_LucidDreamer33) June 17, 2023
“No soul can ever die except by Allah's leave and at a term appointed.”
(The family of Imran: 145) pic.twitter.com/D9vCNPRpf9
व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहे. कुणी याला चमत्कार म्हटलं तर कुणी तिचं नशीब. तर कुणी देवाने तिचा जीव वाचवल्याचं म्हटलं.