जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nandurbar : कारमध्ये बसला अन् एक्सलेटरवर पाय ठेवला, शोरुमध्येच कार सुसाट, एकाचा जागीच मृत्यू, LIVE VIDEO

Nandurbar : कारमध्ये बसला अन् एक्सलेटरवर पाय ठेवला, शोरुमध्येच कार सुसाट, एकाचा जागीच मृत्यू, LIVE VIDEO

नंदुरबारच्या कार शोरूममध्ये भीषण अपघात

नंदुरबारच्या कार शोरूममध्ये भीषण अपघात

नंदुरबार शहरातल्या कार शोरूममध्ये विचित्र अपघात घडला आहे. या अपघाताचं भयानक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

  • -MIN READ Nandurbar,Maharashtra
  • Last Updated :

निलेश पवार, प्रतिनिधी 24 जून, नंदुरबार : नंदुरबार शहरातल्या कार शोरूममध्ये विचित्र अपघात घडला आहे. या अपघाताचं भयानक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. धुळे रोडवरील एका शोरूममध्ये सेल्समन ग्राहकाला नवीन गाडी दाखवत होता, त्याचवेळी गाडीचं नियंत्रण सुटलं आणि गाडी शोरूममध्ये असलेल्या एका कामगाराच्या अंगावर गेली. या अपघातामध्ये शोरूममधील सफाई कामगाराचा मृत्यू झाला आहे. गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे ही गाडी शोरूममध्ये असलेल्या दुसऱ्या गाडीवर जाऊन आदळली, यावेळी मध्ये शोरूममधील कामगार जितेंद्र शिरसाठ उभे होते, तेव्हा ते दोन गाड्यांच्या मध्ये दाबले गेले. अपघातानंतर कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

जाहिरात

अपघातानंतर निष्काळजीपणा दाखवल्यामुळे गाडीचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारचालकाला गाडी चालवता येत होती का? तसंच त्याला या गाडीतल्या ब्रेक आणि एक्सलेटरबद्दल माहिती होती का? याचा तपास पोलीस करत आहेत. गाडी जाऊन आदळल्यानंतर तिथेच उपस्थित असलेले काही जण गाडीच्या जवळ आले आणि त्यांनी चालकाला गाडीबाहेर काढलं, यानंतर त्यातलाच एक जण गाडीमध्ये जाऊन बसला आणि त्याने गाडी रिव्हर्स घेतली. गाडी सुरू व्हायच्या आधी ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा आणि बोनेट उघडंच असल्याचंही सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. इलेक्ट्रिक दुचाकी वापरताना सावधान! बीडमध्ये भयानक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात