1912 मध्ये बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहायला गेलेल्या टायटन पाणीबुडीचीही तीच अवस्था झाली. 22 जून रोजी या पाणबुडीचे अवशेष टायटॅनिक जहाजाजवळ सापडले. यातातील सर्व 5 अब्जाधीशांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये ब्रिटिश व्यावसायिक स्टॉकन रश यांचा समावेश होता. टायटन सबमर्सिबल तयार करणाऱी ओशनगेट कंपनी त्यांनीच 2009 मध्ये स्थापन केली होती. ते या कंपनीचे सीईओ होते.
पॉल-हेन्री नार्गोलेट यांचाही यात मृत्यू झाला. फ्रेंच नौदलात 22 वर्षे सेवा केली होती. जहाजांबाबत असलेलं ज्ञान आणि कौशल्यामुळे पॉल-हेन्री नार्गोलेट यांना 'मिस्टर टायटॅनिक' म्हटलं जाई. आपल्या कारकिर्दीत टायटॅनिक जहाजापर्यंत 37 वेळा जाऊन आलेले होते.
हमिश हार्डिंग हे अॅक्शन एव्हिएशन या विमान विक्री आणि कन्सल्टिंग कंपनीचे अध्यक्षही यात होते. त्यांनी 2019 मध्ये पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांभोवती सर्वात वेगवान उड्डाण करण्याचा आणि महासागराच्या खोल प्रदेशात क्रूड जहाजाद्वारे सर्वात जास्त कालावधीसाठी, सर्वात लांब अंतर प्रवासाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
पाकिस्तानातील बिझनेसमेन शहजादा दाऊद या पाणीबुडीत मृत पावले. पाकिस्तानी ऊर्जा गुंतवणूक कंपनी, एनग्रो आणि गुंतवणूक आणि होल्डिंग फर्म, दाऊद हर्क्युलस कॉर्प या दोन कंपन्याचे उपाध्यक्ष होते. या व्यतिरिक्त त्यांनी विविध कंपन्या आणि संस्थाच्या बोर्डमध्ये काम केलेलं आहे.
त्यांच्यासोबत होता तो त्यांचा 19 वर्षीय मुलगा सुलेमान. हा महाविद्यालयीन विद्यार्थी होता. त्यानं नुकतंच स्कॉटलंडमधील ग्लासगो येथील स्ट्रॅथक्लाइड युनिव्हर्सिटीमध्ये बिझनेस मेजरचं पहिलं वर्ष पूर्ण केलं होतं.
या सर्व अब्जाधीशांना टायटन पाणबुडीसाठी कोट्यवधींचं तिकीट मोजलं होतं. एका तिकिटाची किंमत 2 कोटी रुपये होती.