हैदराबाद 10 ऑगस्ट : तीन अनाथ बहिणींची (Orphan Sisters) एक अशी कथा समोर आली आहे, जी वाचून तुमचेही डोळे पाणावतील. आई, वडील आणि आजीचा मृत्यू...यानंतर लहान बहिणीचं हरवणं आणि काही वर्षांनंतर तिन्ही बहिणी एकमेकींना अनाथाश्रमात भेटणं. ही घटना एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणेच (Filmy Story) आहे. यातील एक एक गोष्ट तुम्हाला भावुक करेल. तीन वर्षाआधी दोन बहिणींना अनाथाश्रमात आणलं गेलं. मात्र, लहान बहिणीचा काहीच पत्ता लागेना. मात्र, अखेर एका सायन्स फेअरच्या फोटोमुळे त्यांना पुन्हा एकत्र आणलं आणि आता या तिघीही सोबत राहतात.
इंडियन एक्सप्रेससोबत बातचीत करताना हैदराबादचे (Hyderabad) जिल्हा कल्याण अधिकारी अकेश्वर राव म्हणाले, की हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. राव यांनी सांगितलं, की या तरुणी आपल्या वडिलांसोबत राहत होत्या. मात्र, तीन वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. यानंतर या मुलींना अनाथाश्रमात घेऊन जाण्यात आलं. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं, की त्यांची एक बहीण आहे, जी आजीसोबत राहत होती. मात्र, ती कुठे होती याबाबत कोणालाही काही माहिती नव्हती.
उच्चाधिकारी लेकीला पाहून इंन्स्पेक्टर बापाचं उर आलं भरून; सॅल्युट मारलेला PHOTO
राव पुढे म्हणाले, की आमच्या राज्यामधील अनाथाश्रमचे अधिकारी आणि काउन्सिलर अनेक कार्यक्रम आयोजित करतात. यात मुलांना सहभागी करून घेत त्यांचा उत्साह वाढवतात. यातील एक होता या वर्षीच्या सुरुवातीला आयोजित केलेला विज्ञान मेळावा. या मेळाव्याचे काही फोटो अनाथाश्रमांमध्ये वाटले गेले. यानंतर 12 आणि 14 वर्षाच्या या मुलींना आपल्या केअरटेकरला सांगितलं, की यातील एक मुलगी त्यांच्या हरवलेल्या बहिणीसारखी दिसते.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजीच्या मृत्यूनंतर लहान बहीण रस्त्यावर फिरू लागली. नंतर तिला एका अनाथाश्रमात ठेवलं गेलं. राव म्हणाले, की जेव्हा आम्ही या लहान मुलीला तिच्या दोन बहिणींना भेटवलं, तेव्हा तिनं आपल्या बहिणींना ओळखलं नाही. मात्र, त्यांना पूर्ण विश्वास होता, की ही त्यांची हरवलेली बहीणच आहे. यानंतर तिघींची डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि यातून त्या बहिणीच असल्याचं स्पष्ट झालं.
मनाला चटका लावणारी बातमी...म्हणून या वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूची चर्चा गावभर
बाल कल्याण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वडिलांच्या मृत्यूनंतर काही काळ दोघी मोठ्या बहिणीही वेगवेगळ्या ठिकाणी राहत होत्या. मात्र, अधिकाऱ्यांसोबत बातचीत करून दोघी एकत्र आल्या. राव म्हणाले, की जेव्हा आम्हाला लहान मुलगी सापडली तेव्हा ती 4-5 वर्षांची होती. यानंतर तिला अमीनपुर येथील एका लहान मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्थानात ठेवलं.. एप्रिल 2020 मध्ये तिला अमीरपेट येथील एका सरकारी संस्थेत ट्रान्सफर केलं गेलं, मात्र तिनं आपल्या बहिणी किंवा कुटुंबाचा काहीही उल्लेख केला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hyderabad, Viral news